बेकायदेशीर गर्भपात प्रकरणी महिलेस सोमवारपर्यंत कोठडी

बेकायदेशीर गर्भपात प्रकरणी महिलेस सोमवारपर्यंत कोठडी

Published on

बेकायदेशीर गर्भपात प्रकरणी
महिलेस उद्यापर्यंत कोठडी
तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे
सकाळ वृत्तसेवा
बार्शी शहर, ता. २७ : श्रीपत पिंपरी (ता. बार्शी) येथे महिलेचा बेकायदेशीर गर्भपातामुळे मृत्यू झाला होता. त्या प्रकरणी घटनेतील मदतनीस वंदना कामत या संशयित महिला आरोपीस शुक्रवारी (ता. २६) पोलिसांनी अटक केली. तिला न्यायालयात उभे केले असता, न्यायालयाने सोमवारपर्यंत (ता. २९) पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक अशोक सायकर यांनी दिली.
बेकायदेशीर गर्भपात प्रकरणी अजून काही, कुठे धागेदोरे किंवा रॅकेट आहे का, असा संशय असल्यामुळे जिल्हा पोलिस प्रमुखांनी सोलापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे तपास वर्ग केला आहे. घटनेचा अधिक तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक जगताप करीत आहेत. बेकायदेशीर गर्भपात प्रकरणी वृषाली वैभव मोरे (रा. बोरगाव (काळे), जि. लातूर) या महिलेचा १४ डिसेंबर रोजी मृत्यू झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com