

भोर, ता. ८ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत भोर तालुक्याचा निकाल ९६.३८ टक्के लागला. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या निकालात सुमारे एका टक्क्याने घट झाली. तालुक्यातील ५० विद्यालयांपैकी २२ विद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला. गतवर्षी दहावीचा निकाल ९७.२५ टक्के लागला होता.
यावर्षी तालुक्यातील ५० हायस्कूलमधून परीक्षा दिलेल्या २ हजार १०१ विद्यार्थ्यांपैकी २ हजार २५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ६०२ विद्यार्थी हे अतिप्रगत (डिस्टींक्शन) श्रेणीमध्ये पास झाले आहेत. ७९१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ४९४ विद्यार्थी व्दितीय क्षेणीत, तर १३८ विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले. तालुक्यातील ७६ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.
शंभर टक्के निकाल लागलेली विद्यालये- न्यू इंग्लिश स्कूल न्हावी, नागेश्वर विद्यालय आंबवडे, वीर बाजी पासलकर विद्यालय शिंद, महात्मा ज्योतिबा फुले प्रशाला शिंदेवाडी, न्यू इंग्लिश स्कूल संगमनेर, काशिनाथराव खुटवड माध्यमिक विद्यालय हातवे बुद्रुक, अप्पासाहेब बांदल विद्यालय आळंदे, येसाजी कंक माध्यमिक विद्यालय करंदी-वाढाणे, मुरारबाजी माध्यमिक विद्यालय वाठार हिंगे, रोहिडेश्वर माध्यमिक विद्यालय नाटंबी, बाजी पासलकर विद्यालय बाजारवाडी, संत लिंगनाथस्वामी माध्यमिक विद्यालय निगडे, जिजामाता विद्यालय भोर, समर्थ रामदास स्वामी विद्यालय हर्डोशी, श्री समर्थ विद्यालय केळव़डे, न्यू इंग्लिश स्कूल कुसगाव, पालसिद्धेश्वर माध्यमिक विद्यालय पाले, अमृतराव बांदल विद्यालय सांगवी, जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूल, अमृता विद्यालयम् नसरापूर, भोर इंग्लिश मीडियम स्कूल भोलावडे, नवसह्यादी गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल नायगाव.
तालुक्यातील इतर विद्यालयांचा निकाल- राजा रघुनाथराव विद्यालय (९६.१५), श्री शिवाजी विद्यालय नसरापूर (९९.१५), श्री छत्रपती शिवाजी विद्यालय किकवी (९७.३३), श्री छत्रपती शिवाजी विद्यालय भोर (८८.५२), क्रांतिवीर फडके माध्यमिक विद्यालय चिखलगाव (९७.१४), सारोळे माध्यमिक विद्यालय (९७.७७), माध्यमिक विद्यालय पिसावरे (८१.८१), गर्ल्स हायस्कूल भोर (९३.५४), आपटी माध्यमिक विद्यालय (९६.१५), पसुरे माध्यमिक विद्यालय (७५), न्यू इंग्लिश स्कूल वरवे (९७.९५), न्यू इंग्लिश स्कूल उत्रौली (९०.९०), सिदोजी थोपटे विद्यालय खानापूर (९८.०३), घेवडेश्वर माध्यमिक विद्यालय महुडे बुद्रुक (८२.३५), राजगड ज्ञानपीठ माध्यमिक विद्यालय जोगवडी (७७.७७), कान्होजी जेधे विद्यालय कारी (९५), रायरेश्वर माध्यमिक विद्यालय टिटेघर (९६.९६), काळेश्वरी माध्यमिक विद्यालय अंबाडे (९४.७३), रायरी माध्यमिक विद्यालय (८०), माता कुरुंजाई माध्यमिक विद्यालय कुरुंगवडी (८८.४६), शासकीय आश्रम शाळा पांगारी (९६.१५), न्यू इंग्लिश स्कूल कामथडी (९५), विजय मुकुंदराव आठवले माध्यमिक विद्यालय माळेगाव (९७.९५), बारे-बसरापूर माध्यमिक विद्यालय बारे बुद्रुक (९३.७५), माध्यमिक विद्यालय कांबरे (८६.३६) आणि शासकीय आश्रम शाळा कुरुंजी (९५.६५), समर्थ विद्या मंदिर वेळवंड (९२.३०), शासकीय आश्रमशाळा कुरुंजी (९७.०५).
गेल्या पाच वर्षांचा निकाल
सन २०२२- ९९.४४ टक्के
सन २०२३ - ९७.३२ टक्के
सन २०२४ - ९६.८८ टक्के
सन २०२५ - ९७.२५ टक्के
सन २०२६ - ९६.३८ टक्के