''निर्भय बनो''

''निर्भय बनो''

‘निर्भय बनो’चा स्वार्थी राजकारणाला विरोध : डॉ. चौधरी
भोसरी, ता. ६ : ‘माझ्यासह देशातील कोणत्याही समाजाचा राम मंदिराला विरोध नाही. मात्र राम मंदिराच्या आडून स्वार्थी राजकारण करणाऱ्यांना विरोध आहे. राम मंदिर अद्याप बांधून पूर्ण झालेले नाही. मग एप्रिलमध्ये येणाऱ्या रामनवमीला का उद्घाटन नाही...तर याचे मुख्य कारण म्हणजे निवडणूका लवकर होत आहेत. अशा राजकारणास आमचा विरोध आहे,’ असे ज्येष्ठ विचारवंत डॉ. विश्वंभर चौधरी यांनी सांगितले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील मैदानात इंडिया आघाडी आणि विविध सामाजिक संस्थेद्वारे झालेल्या ‘निर्भय बनो’ सभेत ते बोलत होते. ज्येष्ठ विचारवंत मानव कांबळे अध्यक्षस्थानी होते. या वेळी व्याख्याते ॲड. असीम सरोदे, डॉ. कैलास कदम, तुषार कामठे, सचिन भोसले, सुलक्षणा शिलवंत-धर, चेतन बेंद्रे यांच्यासह आघाडीतील पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ. चौधरी पुढे म्हणाले, “संविधानाचे राज्य येणार की मनुस्मृतीचे, हे ठरणार असल्याने आगामी लोकसभा निवडणूक महत्त्वाची आहे. त्यामुळे सर्वांनी सामाजिक सुरक्षिततेसाठी मतदान करणे गरजेचे आहे.”
ॲड. सरोदे म्हणाले, “निर्भय बनो आंदोलनाचा विरोध मोदी-शहांना नाही, तर त्यांच्या स्वार्थी राजकारणाला आहे. मोदी-शहा कधीच देशाच्या विकासावर बोलत नाहीत. ते नेहमीच खोटी भाषणे करून समाजामध्ये द्वेष पसरविण्याचा प्रयत्न करतात. भाषणातून जर मुस्लिम, दहशतवाद, पाकिस्तान, धर्म असे शब्द गाळायला सांगितले तर मोदी-शहा तीन मिनिटेही बोलू शकणार नाहीत.”
माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी प्रास्ताविक केले. प्रदीप पवार यांनी आभार मानले.
---
पावसाचा ‘रिझल्ट’ चांगला असतो
डॉ. विश्वंभर चौधरी भाषण करीत असतानाच पाऊस सुरू झाला. त्या वेळी श्रोत्यांनी सुमारे अर्धा तास उभे राहून खुर्च्या डोक्यावर घेऊन भाषण ऐकले. यावर डॉ. चौधरी म्हणाले, “पावसात झालेल्या सभेचा ‘रिझल्ट’ चांगला असतो.” त्यांच्या या वाक्याला श्रोत्यांनी टाळ्या वाजवून दाद दिली.
-----
फोटो- ९४३३८

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com