मृदशास्त्र परिषदेस 
शास्त्रज्ञांची भेट

मृदशास्त्र परिषदेस शास्त्रज्ञांची भेट

Published on

बालेवाडी, ता. १ ः सोलापूर येथील कृषी संशोधन केंद्राचे माजी प्रमुख शास्त्रज्ञ प्रा. डॉ. जनार्दन कदम व राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील ११ मृद शास्त्रज्ञांनी कोईमतूर येथील तमिळनाडू कृषी विद्यापीठात पार पडलेल्या चार दिवसीय भारतीय मृदशास्त्र परिषदेस उपस्थिती लावली.
यावेळी डॉ. हिमांशू पाठक यांनी ‘एआय’चा शेतीसाठी वापर, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, एकरी दुप्पट उत्पन्न कसे करता येईल, यावर मार्गदर्शन केले. परिषदेस भारतातील पाचशे मृद शास्त्रज्ञ व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी एकूण ५०० शोधनिबंध प्रदर्शित करण्यात आले.
प्रा. कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी ऊस पैदासकर संस्थेच्या प्रक्षेत्रास भेट देऊन तीन हजार जातींची माहिती घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com