बाणेरमध्ये २२७ जणांचे रक्तदान

बाणेरमध्ये २२७ जणांचे रक्तदान
Published on

बालेवाडी, ता. १२ : बाणेरमधील श्री राम मंदिरात वसुंधरा अभियान बाणेर या वृक्षसंवर्धन व पर्यावरण पूरक उपक्रम संस्थेच्या वतीने १४वे रक्तदान शिबिर झाले. यावेळी २२७ जणांनी रक्तदान केले.
शिवाजीनगरमधील शेतकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महानंद माने व बाणेर वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत
यांच्या हस्ते शिबिराचे उद्‍घाटन करण्यात आले. याप्रसंगी सर्पमित्र गणेश माने यांनी साकारलेल्या रांगोळीने सर्वांचे लक्ष वेधले. ज्ञानेश्वर कोटगिरे यांच्याकडून प्रत्येक रक्तदात्यास एक झाड देण्यात आले. तसेच वसुंधरा अभियानकडून पर्यावरण कापडी पिशवी व प्रमाणपत्र देण्यात आले. जनकल्याण रक्तपेढीमार्फत याचे संकलन केले. इनडियन डेंटल असोसिएशन टीमच्या माध्यमातून रक्तदात्यांची दंतचिकित्सा करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com