शिवसंस्कार शिबिरात मर्दानी खेळ सादर

शिवसंस्कार शिबिरात
मर्दानी खेळ सादर
Published on

चाकण, ता. १२ : किल्लेदार फिरंगोजी नरसाळा स्मारक प्रतिष्ठानच्या वतीने येथील ऐतिहासिक संग्राम दुर्ग येथे शिवसंस्कार शिबिराचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या शिबिरात चाकण परिसरातील मुला-मुलींसह महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून शिवकालीन युद्धकला आणि संस्कारांचे धडे गिरवले.
शिबिराचे उद्‍घाटन प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. किरण झिंजुरके, डॉ. संदीप महिंद गुरुजी, पोलिस उपनिरीक्षक चंद्रशेखर मोरखंडे आदी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजनाने झाले. शिबिरात लेझीम, योगासने आणि मर्दानी खेळांची थरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
या उपक्रमाचा भाग म्हणून संगमनेर येथील शहागड किल्ल्यावर दुर्गअभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी किल्ल्याची तटबंदी, बुरूज आणि ऐतिहासिक रचनेची प्रत्यक्ष माहिती घेतली. या अभ्यासदौऱ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये ऐतिहासिक वारसा जतनाची प्रेरणा निर्माण झाली. कार्यक्रमाचा समारोप दामोदर आरती, शिववंदना आणि महाप्रसादाने झाला. यावेळी ॲड. किशोर झिंजुरके, राहुल वाडेकर, योगेश साखरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com