फुरसुंगीमध्ये पुन्हा वाहतूककोंडी

फुरसुंगीमध्ये पुन्हा वाहतूककोंडी

फुरसुंगी, ता. १० ः उड्डाणपुलावर ट्रक बंद पडल्याने फुरसुंगीकरांना सोमवारी (ता. १०) सकाळपासूनच वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. येथील वाहतूककोंडीवर मार्ग काढावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
येथील उड्डाणपूल वाहतुकीस अपुरा पडत आहे. कायमच पुलावरून एका पाटोपाट एक वाहने जात असतात. दोन्ही बाजूने वाहतूक सुरू असल्यास ओव्हरटेक करता येत नाही. अशात सोमवारी सकाळी येथील उड्डाणपुलावर ट्रक बंद पडल्याने एकाच बाजूने वाहतूक सूर होती. त्यामुळे वाहतूककोंडी होऊन सकाळीच वाहनांच्या रांगा दोन्ही बाजूने एक किलोमीटरपर्यंत लागल्या. रिमझिम सुरू असलेला पाऊस आणि लांब लागलेल्या रांगा यातून वाट काढत कामगारवर्गाला पहिल्याच दिवशी कामाचे ठिकाण गाठावे लागण्याची वेळ आली.
आठवड्यातील पहिल्या दिवशीच्या सकाळपासूनच या मार्गावरील प्रवाशांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. सध्या सुरू असलेला पाऊस काच्या रस्त्याला पडलेले खड्डे, चिखल आणि रस्त्याचा असमतोलपणा यामुळे पावसाळ्यात या मार्गावर वाहने केवळ डांबरीरस्त्याचा वापर करत असतात. यामुळे रस्ता मोठा असून देखील वाहतुकीसाठी तो उपलब्ध होत नाही, असे रहिवासी संतोष हरपळे, सोमनाथ यादव यांनी सांगितले.

फुरसुंगी ः वाहनांच्या लांब रांगा लागल्याने वाहतूककोंडी झाली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com