दिवे घाटात दिवसा बिबट्याचे दर्शन

दिवे घाटात दिवसा बिबट्याचे दर्शन

Published on

फुरसुंगी, ता. ६ : दिवे घाटात शुक्रवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास प्रवाशांना अचानक बिबट्याचे दर्शन झाले. बिबट्याने रस्ता ओलांडल्याची चित्रफीत व्हायरल झाली.
सासवडवरून वडकीकडे येताना घाटाच्या उताराला बिबट्या दिसला. वडकीपासून तिसऱ्या वळणावर बिबट्या अचानक डोंगरावरून उतरून रस्ता ओलांडून झाडांमध्ये जाताना वडकीतील नागरिक तसेच प्रवाशांना दिसला. बिबट्या रस्ता ओलांडताना जवळून जाणारे दोन दुचाकीस्वार थोडक्यात बचावले. त्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली. त्याच वेळेस मोबाईलमध्ये चित्रीकरण केल्याचे प्रवीण मोडक यांनी सांगितले.
दरम्यान, घाटात बिबट्या दिसल्यामुळे या परिसरातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वडकीच्या ग्रामस्थांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. मागील दोन दिवसांपासून बिबट्या दिसत असल्याचे अनेकांकडून सांगण्यात येत होते. मात्र कोणाकडे तसे छायाचित्र किंवा चित्रफीत आढळली नव्हती, मात्र ग्रामस्थ सावधगिरी बाळगून होते.
---
दिवे घाटात बिबट्या दिसल्याबाबत आम्हाला माहिती मिळाली आहे. आम्ही रात्री गस्त घालून त्याचा ठावठिकाणा समजावा म्हणून माहिती घेत आहोत. नागरिकांनीही सतर्क राहावे.
- मंगेश संकपाळ, वन परिमंडळ अधिकारी
---

सेल्फी घेताना...
सध्या पावसाळा सुरु झाला आहे. दिवे घाटात पर्यटनासाठी तुलनेने कमी धोका असल्याने बरेच पर्यटक येतात. अनेक जण लहान मुलांना घेऊन धबधबे आणि निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी येत असतात. बहुतेक जण घाटात सेल्फी घेण्याच्या नादात असतात. पर्यटकांनी सहलीचा आनंद घेताना काळजी घेणे गरजेचे आहे. शक्यतो एकटे न राहता जमावाने राहावे, असा सावधगिरीचा सल्ला ग्रामस्थ शिवाजी काळाने, अक्षय खुटवड यांनी दिला.
-----

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.