उरुळीदेवाची भागात प्रवास धोक्याचा

उरुळीदेवाची भागात प्रवास धोक्याचा

Published on

फुरसुंगी, ता. १५ : उरुळीदेवाची भागात पालखी महामार्गावर काम सुरू असलेल्या ठिकाणी सूचना फलक, रिफ्लेक्टर, बॅरिकेड लावले नसल्याने प्रवाशांना धोका निर्माण झाला आहे. आवश्यक उपाययोजना करून येथील प्रवास सुरक्षित करावा, अशी नागरिकांकडून मागणी होत आहे.
फुरसुंगी ते वडकी दरम्यान सध्या पालखी महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. या टप्प्यातील उरुळीदेवाची येथील ओढ्यावरील पुलाचे आणि सेवा रस्त्यांचे काम सुरू आहे. यासाठी नाल्याला दोन्ही बाजूने मोठे खड्डे करून बांधकाम सुरू आहे. या खड्ड्यांच्या बाजूला बॅरिकेड उभारण्यात आले नसल्याने रात्रीच्या वेळेस खड्डा न दिसल्याने मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. धोकादायक ठिकाणी धोका दर्शविणारे दिवे लावण्यात आलेले नाहीत. रात्रीच्या वेळेस यासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली नाही.

साध्या पत्र्याचे बॅरिकेड तयार करण्यात आले आहेत. या बॅरिकेडला धडकल्यास मोठी दुखापत होईल हे पहाताक्षणी दिसून येते. अशा बॅरिकेडला प्रशासनाकडून परवानगी कशी देण्यात आली? परवानगी देण्याअगोदर त्याची पाहणी करणे आवश्यक होते.
- महेंद्र सरोदे, स्थानिक रहिवासी

पालखी महामार्गाच्या कामाचे स्वागत आहे. आम्ही प्रशासनाला यासाठी मदतच करत आहोत. या मार्गावर अनेकांचे बळी गेले आहेत. असा प्रकार घडू नये यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. यासाठी प्रशासन सांगेल ते सहकार्य करण्याची आमची तयारी आहे.
- संजय हरपळे, ग्रामस्थ, फुरसुंगी

सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य उपाययोजना करण्याचे कर्मचाऱ्यांना सांगण्यात आले असून आवश्‍यक त्या ठिकाणी बॅरिकेड लावण्यास सांगितले आहे.
- अभिजित आवटी, राष्ट्रीय महामार्ग विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com