पथारीचे थकीत बिल हप्त्यात भरण्यास मंजुरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पथारीचे थकीत बिल हप्त्यात भरण्यास मंजुरी
पथारीचे थकीत बिल हप्त्यात भरण्यास मंजुरी

पथारीचे थकीत बिल हप्त्यात भरण्यास मंजुरी

sakal_logo
By

पुणे, ता. ३ : शहरातील अनेक पथारीधारकांचे बिल थकीत असल्याने संबंधित ‘स्टॉल’ला प्रशासनाकडून टाळे लावले जात होते. गुरुवार (ता. २) नगर पथ विक्रेता समिती व महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत थकीत बीलासंबंधी निर्णय घेण्यात आला. यामध्ये पथारीधारकांना पाच हप्त्यात बिल भरण्यासाठी मुदत दिली आहे.

महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये पथारीधारकांचे सर्वेक्षण पुढील आठ दिवसांत सुरू केले जाणार आहे. तसेच ज्या ठिकाणी भाडेपट्याने स्टॉल भाड्याने दिले गेले आहेत ते जप्त केले जातील, ज्या व्यक्तीच्या नावे परवाना आहे, त्यांनीच तिथं थांबायचे, अशी माहिती उपायुक्त माधव जगताप यांनी दिली. बिलासंबंधी सक्ती करू नये, अधिकृत स्टॉलवर कारवाई करू नये, स्टॉलधारकांना मदतनीस ठेवण्यास परवानगी मिळावी, तसेच पथारी व्यावसायिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, या मागण्या नगर पथ विक्रेता समितीच्यावतीने प्रशासनाकडे केल्या. यावेळी वाहतूक विभागाचे अर्जुन बोत्रे, गजानन पवार, मंदार धुमाळ, सागर दहिभाते, ज्ञानेश्वर कोठावळे, निलीमा अय्यर, कमल जगदाने, शहानवाज बागवान, भीमाताई लाडके आदी उपस्थित होते.