‘समतेचा महानायक’ विशेषांकाचे प्रकाशन

‘समतेचा महानायक’ विशेषांकाचे प्रकाशन

पुणे, ता. ३० ः ‘समतेचा महानायक’ या पुस्तकामध्ये लेखकांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे खूप वेगवेगळ्या पद्धतीने पाहिले आहे, अशा पद्धतीची पुस्तके सातत्याने येत राहणे, ती समाजापर्यंत पोहोचत राहणे आवश्‍यक आहे, असे मत अंजली आंबेडकर यांनी व्यक्त केले. जाणीव फाउंडेशन आयोजित ‘समतेचा महानायक’ या विशेषांकाचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली आंबेडकर यांच्या हस्ते डॉ. नीतू मांडके सभागृह, टिळक रस्ता येथे प्रकाशन झाले. या वेळी त्यांनी आपले विचार व्यक्त केले.

सामाजिक कार्यकर्ते डॉ. अमोल देवळेकर, अभिनेते मिलिंद शिंदे, सरहद संस्थेचे पदाधिकारी शैलेश वाडेकर, प्राध्यापक कैलास थावरे, पुणे विद्यापीठाचे डॉ. संजय भैलुमे, उद्योजक कदम या वेळी उपस्थित होते. चित्रपट क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल अभिनेते मिलिंद शिंदे यांचा जाणीव संस्थेतर्फे सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमांत अंजली आंबेडकर यांचा विविध सामाजिक संस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी गोपाळ कांबळे व अमोल ननावरे यांनी केले तर प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष अमोल काटे यांनी केले. संदीप काळे, किरण साबळे ,नवनीत अहिरे, वैभव वांढरे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com