

पुणे, ता. १६ : ‘परिवर्तन, सातारा’ संस्था आणि ‘नाटकघर, पुणे’ यांच्यातर्फे देण्यात येणाऱ्या ‘मानसरंग नाट्य-शिष्यवृत्ती’साठी २०२३ या वर्षी उदयोन्मुख नाटककार हिमांशू स्मार्त, अजित साबळे आणि अनिल कोष्टी यांची निवड करण्यात आल्याची माहिती अतुल पेठे, डॉ. हमीद दाभोलकर आणि राजू इनामदार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पेठे म्हणाले की, दोन्ही संस्थांमार्फत गेली पाच वर्षे मानसिक आरोग्याच्या प्रश्नांवर कला अभिव्यक्तीच्या माध्यमातून उपचार आणि प्रबोधन करण्यासाठी ‘मानसरंग’ नावाचा मंच चालवला जातो. या मंचाचा एक कार्यक्रम म्हणून गेल्या वर्षीपासून मानसिक आरोग्याच्या प्रश्नावर नाटकाच्या माध्यमातून भाष्य आणि जनजागृती करण्यासाठी ‘मानसरंग नाट्य-शिष्यवृत्ती’ जाहीर करण्यात येत आहे. या नाट्य-शिष्यवृत्तीसाठी निवडलेले तिनही नाटककार या नाट्य शिष्यवृत्तीच्या माध्यमातून मानसिक आरोग्याविषयी भाष्य करणारे नाटक बसवणार आहेत. प्रत्येकी पन्नास हजार रुपये असे या शिष्यवृत्तीचे स्वरूप आहे. शिष्यवृत्तीअंतर्गत बसवण्यात आलेल्या तिन्ही नाटकांचा ‘मानसरंग नाट्य-महोत्सव’ हा ५ नोव्हेंबर या मराठी रंगभूमी दिवशी ‘द बॉक्स, पुणे’ या रंगमंचावर केला जाणार आहे. बजाज ऑटो यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून याला आर्थिक मदत मिळाली असल्याचेदेखील त्यांनी नमूद केले. ‘मानसरंग’चे समन्वयक राजू इनामदार आणि रेश्मा कचरे या वेळी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.