विकासासाठी मोकाटे यांना विधानसभेत पाठवा : शिवा मंत्री
पुणे, ता. १७ : कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत मोकाटे यांना कोणत्याही परिस्थितीत विधानसभेत पाठवून कोथरूड विधानसभा मतदार संघाचा विकास करायचाच, असा निर्धार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष व माजी नगरसेवक शिवा मंत्री यांनी केला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व आपच्या कार्यकर्त्यांनी मोकाटे यांच्या प्रचारार्थ प्रचारफेरी काढली. यावेळी
मंत्री यांच्याबरोबर शिवसेना शहर उपाध्यक्ष राजेश पळसकर, उमेश कंधारे, हेमंत धनवे, विजय रावडे, योगेश तापकीर, देविदास पवार, भगवान कडू, गिरीश गुरनानी, गोविंद थरकुडे, विनायक सूर्यवंशी, जितेंद्र भालेराव, अण्णा गोसावी, अनंत हुलावळे, कांता हुलावळे उपस्थित होते.
पांडुरंग कॉलनी, एरंडवणे गावठाण, गणेश नगर, चाळ क्रमांक १, ३, ७, १०, नवसह्याद्री सोसायटी, पटवर्धन बाग, ताथवडे उद्यान आदी परिसरात मंत्री, कळस्कर, कंधारे, कडू हे गेल्या काही दिवसांपासून दररोज सोसायटी व गावठाण परिसरात प्रचार करत आहेत. या परिसरातील नागरिकांना व रहिवाशांना मोकाटे यांनी केलेल्या विकासकामांची माहिती देऊन मोकाटे यांना संधी देण्याचे आवाहन करतात. मतदारसंघातील विविध समस्या सांगून त्या सोडविण्याचे आवाहनही नागरिक त्यांना करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

