बाल नाट्यगृहाचा पडदा अजूनही उघडेना

बाल नाट्यगृहाचा पडदा अजूनही उघडेना

Published on

मयूर कॉलनी, ता. ४ : नाटक, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी शहरात लवकर नाट्यगृह उपलब्ध होत नाहीत, अशी खंत नाट्य कलाकारांनी अनेकवेळा व्यक्त केली आहे. अशी परिस्थिती असताना महापालिकेच्या वतीने कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या बाजूला कै. बाळासाहेब ठाकरे बाल नाट्यगृह उभारण्याचे काम मार्च २०१५ पासून कासवगतीने सुरू आहे.
वाहनतळ, पोडीयम, कार्यालय, ३८५ आसन व्यवस्थेचे बाल नाट्यगृह व कै. बाळासाहेब ठाकरे कलादालन उभारण्याचे काम सध्या सुरू आहे. नव्याने होत असलेल्या या नाट्यगृहासाठी १० वर्षांचा प्रदीर्घ कालावधी आणि मार्च २०२५ पर्यंत तब्बल २९ कोटी रुपये खर्च करूनही नाट्यगृहाची अनेक कामे अर्धवट अवस्थेत आहेत. इतकी वर्ष प्रतिक्षा केल्यानंतरही सर्व कामे पूर्ण होण्यासाठी डिसेंबर महिनाअखेर उजाडेल, अशी माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली. अधिक माहितीसाठी महापालिका कार्यकारी अभियंता वीरेंद्र केळकर यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.


उर्वरित कामे
-पहिल्या मजल्या लिफ्ट बसवणे,
- कलाकारांच्या खोलीत फर्निचर व विद्यूत विषयक कामे करणे
- रंगमंचावर मुख्य पडदा बसविणे
- पोडीयमवर आकर्षक पॅनल्स व म्युरल बसविणे
- पहिल्या मजल्यावरील कलादालनातील कामे, इमारतीचे अंतिम रंगकाम, ठाकरे याच्या अर्धाकृती पुतळ्याच्या ठिकाणी विद्यूत विषयक कामे करणे

वाहनतळात मद्यपान, जागोजागी राडारोडा
- ठाकरे बाल नाट्यगृहाच्या वाहनतळात मद्यपींचा वावर असून ठिकठिकाणी दारूच्या बाटल्या पडलेल्या आहेत
- वाहनतळाचे काम अर्धवट असून जागोजागी पाण्याचे तळे साचत आहे
- सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर धूळ साचली आहे
- कचरा व जागोजागी राडारोडा पडलेला आहे

हे बालनाट्यगृह लवकर उभे राहिले, तर यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचा भार हलका होईल. शहरात विविध कार्यक्रमांसाठी नाट्यगृह मिळत नाहीत ही, मोठी शोकांतिका आहे. गणेशोत्सवापर्यंत कै. ठाकरे बालनाट्यगृह सुरू झाले नाही तर, आम्ही सर्व कलाकार उपोषणास बसणार आहोत.
- सुनील महाजन, अध्यक्ष, कोथरूड नाट्य परिषद

मागील तीन महिन्यात यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात झालेले कार्यक्रम
- मार्च : ७९
- एप्रिल : ७४
- मे : ८२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com