खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गजाआड
सासवड शहर, ता. ४ : खानापूर (ता. हवेली) मधील खुनाच्या गुन्ह्यातील एका फरार आरोपीला सासवड पोलिसांनी चांबळी येथे अटक केली. श्रीनाथ अशोक बडदे (वय २४, रा. कोडीत) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
हवेली पोलिस ठाण्याच्या हद्दीत घेरा सिंहगड परिसरात १४ सप्टेंबर रोजी रात्री जुन्या भांडणाच्या वादातून सोमनाथ अनंता वाघ (वय २४) याचा गोळ्या घालून खून करण्यात आला होता. याबाबत हवेली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, यापूर्वी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.
सासवडचे पोलिस निरीक्षक हृषिकेश अधिकारी, हवालदार रूपेश भगत, जब्बार सय्यद, गणेश पोटे चांबळी, गराडे, कोडीत भागात गस्त घालत होते. त्यावेळी श्रीनाथ बडदे चांबळी येथे आढळून आला. त्याला हवेली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. हवेली पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक सचिन वांगडे तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

