

गुनाट, ता. ९ : येथील एका शेतकऱ्याचा एक एकर ऊस अज्ञात व्यक्तीने बुधवारी (ता. ६) पेटवून दिला. या आगीत उसासह ठिबक सिंचन संचाचे मोठे नुकसान झाले असून, शिरूर पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
गुनाट (ता. शिरूर) येथील विजय वाबळे यांच्या शेतात ही घटना घडली. वेळीच आग आटोक्यात आणल्याने उर्वरित नऊ एकर ऊस वाचवण्यात यश आले. मात्र, या आगीमुळे वाबळे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान, विशेष म्हणजे गेल्या तीन वर्षांत वाबळे यांच्या शेतात आग लागण्याची ही तिसरी-चौथी वेळ आहे. वारंवार घडणाऱ्या या प्रकारामुळे परिसरात संताप व्यक्त होत असून, हा खोडसाळपणा नेमका कोण करत आहे, हे शोधण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.