जावळी विज्ञान प्रदर्शनात मेढा केंद्रशाळेचा प्रथम तर कापसेवाडी हायस्कूल चा द्वितीय क्रमांक
मेढा केंद्रशाळा, कापसेवाडीचे विद्यालयाची बाजी
जावळी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन; बालवैज्ञानिकांचे कौतुक
हुमगाव, ता. १५ ः जिल्हा परिषद, जावळी पंचायत समिती व येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात जिल्हा परिषदेचे मेढा केंद्र शाळेने प्रथम, तर कापसेवाडीच्या महायोगी गगनगिरी विद्यालयाने दुसरा क्रमांक पटकावला.
तीन दिवस सुरू असलेल्या या प्रदर्शनाला तालुक्यातील शेकडो विद्यार्थी, शिक्षक व विज्ञानप्रेमींनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांतील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी व नवनवीन संकल्पना साकार करण्यासाठी विज्ञान प्रदर्शन गरजेचे असल्याचे प्रतिपादन माध्यमिकचे उपशिक्षणाधिकारी तेजस गंबरे यांनी यावेळी केले. श्री. गंबरे व मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. प्रदर्शनात प्राथमिक गटात जिल्हा परिषद केंद्र शाळा मेढ्याचे विद्यार्थी कार्तिक मर्ढेकर व साई आगलावे यांनी बनवलेल्या बहुउद्देशीय टोपीला प्रथम क्रमांक मिळाला. सह्याद्री माध्यमिक विद्यालयाचा सार्थक हिरवेच्या खत टाकणी जॅकेटला दुसरा, तर कुडाळ केंद्र शाळेच्या वरद रासकर व प्रज्वल दीक्षित यांच्या आत्महत्या रोखणारा पंखा या उपकरणास तिसरा क्रमांक मिळाला.
माध्यमिक गटात महायोगी गगनगिरी विद्यालयाच्या प्रेम देशमुख याने बनवलेल्या डेअरी फार्म ऑटोमेशन युजिग इंटरनेट या उपकरणास प्रथम, करंदी तर्फ कुडाळच्या जनता माध्यमिक विद्यालयातील अजय निकम याच्या महामार्ग अपघात टाळणे या प्रकल्पास द्वितीय, तर येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या अथर्व पवार याच्या सीड ड्राॅप उपकरणास तिसरा क्रमांक मिळाला. यावेळी प्रा. अविनाश ढेबे, नीलेश होमकर, स्वाती नष्टे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
पारितोषिक वितरणास डाॅ. अभय देशपांडे, दादासाहेब शिंदे, सयाजीराव शिंदे, शिक्षणविस्तार अधिकारी चंद्रकांत कर्णे, विस्तार अधिकारी उस्मान मणेर, मिलन मुळे, उमेश मोरे, केंद्रप्रमुख हंबीरराव जगताप, सुभाष दुटाळ, वंदना गंगावणे, प्राचार्या निलम चव्हाण उपस्थित होते. डाॅ. शुभांगी कुंभार यांनी सूत्रसंचालन केले. रेश्मा महांगडे यांनी आभार मानले.
............
चाैकट
............
दिव्यांगमध्ये आदित्य गंगावणेच्या
स्वयंचलित नळास बक्षीस
दिव्यांग गटात आदित्य गंगावणेच्या स्वयंचलित नळ या उपकरणास बक्षीस मिळाले. प्राथमिक शिक्षक गटात तेटलीच्या जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका सुवर्णा साळुंखे यांच्या गणितीय मनोरंजक माॅडेलला, तर माध्यमिक गटात बामणोली तर्फ कुडाळच्या न्यू इंग्लिश स्कूलचे सागर नवगण यांच्या प्रकाशाच्या दुनियेत या प्रयोगाला पारितोषिक मिळाले.
............................
A00262
हुमगाव ः विजेत्यांना पारितोषिक देताना तेजस गंबरे. त्या वेळी मान्यवर.
(भाऊसाहेब जंगम ः सकाळ छायाचित्रसेवा)
.....................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

