

JEU26B07954
अक्कलकोट : शरण मठात पट्टाभिषेक सोहळ्या निमित्ताने दोन दिवसाचे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन प्रसंगी माजी खासदार डॉ. श्री. जयसिद्धेश्वर महास्वामी, श्री. अभिनव गजदंड शिवाचार्य महास्वामी, श्री अभिनव शरण शिवालिंगेश्वर महास्वामी व अन्य मठाधीश.
पट्टाभिषेक सोहळ्यानिमित्त दोन दिवस धार्मिक कार्यक्रम
अक्कलकोटच्या शरण मठात आज महारुद्राभिषेक, धर्म ध्वजारोहण
जेऊर, ता. १० ः अक्कलकोट संस्थानचे राजगुरू श्री सिद्धारूढ महास्वामी यांचे अग्रगण्य शिष्य सद्गुरू श्री रेवणसिद्ध शिवशरण महास्वामी मठाचे श्री चौडय्या देवरू यांच्या पट्टाभिषेक सोहळ्यानिमित्ताने दोन दिवस विशेष धार्मिक सोहळा होणार आहे. शरण मठ अक्कलकोट येथे हा सोहळा होत असून रविवारी (ता. १०) पहाटे ब्राम्ही मुहूर्तावर चिक्क रेवणसिद्ध महास्वामी यांच्या समाधी गदगीस महारुद्राभिषेक झाला. तसेच सहस्त्र बिलवार्चन, सहस्त्र नामावली, विशेष अलंकार सहित महाआरती करण्यात आली. यावेळी माजी खासदार डॉ. श्री. जयसिद्धेश्वर महास्वामी, श्री.अभिनव गजदंड शिवाचार्य महास्वामी, श्री अभिनव शरण शिवालिंगेश्वर महास्वामी, श्री चन्नबसव पट्टदेवरू, श्री परमानंद महास्वामी, श्री शंकरानंद महास्वामी यांसह अन्य मठाधीश व मान्यवरांच्या उपस्थितीत आजचे कार्यक्रम झाले. त्यानंतर सकाळी नऊ वाजता सर्व मठाधीशांच्या उपस्थितीत धर्म ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर वेदांत वेदिका, दिपप्रज्वलन आणि विविध मठाचे मठाधीश व प्रमुख अतिथी यांच्या उपस्थितीत भक्तांसाठी आशीर्वाद धर्मसभा घेण्यात आली. कार्यक्रमाचे संयोजन श्री रेवणसिद्ध शिवशरण महास्वामी मठाचे अध्यक्ष सचिव सर्व पदाधिकारी आणि भक्त या सर्वांनी मिळून केले.
आज मुख्य विधी
शरण मठात कार्यक्रमाचा मुख्य विधी सोमवारी होणार असून पहाटे रेवणसिद्ध महास्वामी यांच्या समाधीस महारुद्रभिषेक होईल. तसेच श्री चौडय्या देवरू यांचा पट्टाभिषेक महोत्सव तसेच गुरुवीन उपकार स्मरणे या विषयावर आध्यत्मिक प्रवचन होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.