अक्कलकोटचे श्रीगणेश पंचायतन मंदिर धार्मिक, ऐतिहासिक व स्थापत्य वारशाचे महत्त्वपूर्ण प्रतीक

अक्कलकोटचे श्रीगणेश पंचायतन मंदिर धार्मिक, ऐतिहासिक व स्थापत्य वारशाचे महत्त्वपूर्ण प्रतीक
Published on

JEU26B08420
अक्कलकोट : येथील श्रीगणेश पंचायतन मंदिरातील मूर्तीचे छायाचित्र.
----
अक्कलकोटच्या इतिहासाशी जोडलेले गणेश पंचायतन
स्वामी समर्थ-मालोजीराजे भेटीचा साक्षीदार; दाक्षिणात्य स्थापत्यकलेचा ठेवा
सकाळ वृत्तसेवा
अक्कलकोट, ता. २१ : अक्कलकोट संस्थानच्या जुन्या राजवाड्याजवळील संस्थानिकांचे श्रीगणेश मंदिर तथा चार देवळी पंचायतन हे अक्कलकोटच्या धार्मिक, ऐतिहासिक आणि स्थापत्य वारशाचे महत्त्वपूर्ण प्रतीक आहे. दाक्षिणात्य धर्तीवरील कोरीवकाम असलेल्या या वास्तूमध्ये काळ्या पाषाणातील श्रीगणेशाची मूर्ती असून शिव, सूर्य, शक्ती आणि विष्णू यांच्या मूर्ती पंचायतन रचनेचे वैशिष्ट्य अधोरेखित करतात.
ऐतिहासिक परंपरेनुसार, श्रीमंत मालोजीराजे (दुसरे) भोसले आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांची पहिली भेट याच गणेश पंचायतन मंदिरात झाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे अक्कलकोटच्या राजघराण्याचा इतिहास आणि श्री स्वामी समर्थांच्या चरित्राशी या मंदिराचे नाते जोडले गेले आहे. स्वामी समर्थांनी मालोजीराजांना प्रदान केलेला ‘सूर्यमणी’ व पादुका गुरुपौर्णिमेच्या दिवशी याच मंदिरात विशेष दर्शनासाठी ठेवण्यात येतात.
अक्कलकोटच्या राजघराण्याचा इतिहास, पंचायतन उपासनेची परंपरा, श्री स्वामी समर्थांचे चरित्र आणि दाक्षिणात्य स्थापत्यकलेचा वारसा या चारही पैलूंचा संगम या वास्तूत पाहायला मिळतो. मंदिरातील पूजा-अर्चेचे विधी पुरोहित श्रीपाद प्रकाश पुजारी हे दुसऱ्या पिढीतून करीत आहेत.
मंदिराचे काही भाग नादुरुस्त झाल्याने सध्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेण्यात आले आहे. ऐतिहासिक वास्तूचे मूळ स्वरूप अबाधित ठेवून शास्त्रोक्त पद्धतीने संवर्धन व डागडुजी होणे आवश्यक आहे. या वास्तूच्या जतनामुळे अक्कलकोटच्या धार्मिक व संस्थानी परंपरेचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोचण्यास मदत होणार आहे.
---
कोट :
अक्कलकोट संस्थानच्या या गणेश पंचायतन मंदिराचे काही भाग नादुरुस्त अवस्थेत आहेत. मंदिराचे गतवैभव कायम राहावे, यासाठी जीर्णोद्धाराचे काम हाती घेण्यात आले आहे. मंदिराची ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरा कायम राहावी, यासाठी हे काम सुरू करण्यात आले आहे.
- मालोजीराजे भोसले तिसरे, राजासाहेब, अक्कलकोट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com