''माझी कन्या भाग्यश्री योजना'' लाभार्थ्यांना मुदतठेव प्रमाणपत्रांचे वितरण

''माझी कन्या भाग्यश्री योजना''  लाभार्थ्यांना मुदतठेव प्रमाणपत्रांचे वितरण
Published on

KDW26B04933
कुर्डुवाडी (ता. माढा) ः ‘माझी कन्या भाग्यश्री योजना’ लाभार्थ्यांना मुदत ठेव प्रमाणपत्रांचे वितरण करताना पंडित देशमुख, महेश शेंडे, किरण सूर्यवंशी व अन्य.

‘माझी कन्या भाग्यश्री’च्या लाभार्थींना प्रमाणपत्रांचे वाटप
कुर्डुवाडी, ता. १२ : शासनाच्या ‘माझी कन्या भाग्यश्री योजना’अंतर्गत चार लाभार्थ्यांना प्रत्येकी २५ हजार रुपयांच्या मुदत ठेव प्रमाणपत्रांचे वितरण माढा तालुका पंचायत समितीचे सभापती पंडित देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
शासनामार्फत पूर्वी सुरू करण्यात आलेल्या ‘माझी कन्या भाग्यश्री योजना’मुळे मुलींच्या शिक्षण, आरोग्य आणि भविष्यास आर्थिक आधार मिळाला आहे. सद्यस्थितीत या योजनेचे ‘लेक लाडकी योजना’मध्ये रूपांतर करण्यात आले असून, शासनाकडून मुलींसाठी विविध टप्प्यांवर आर्थिक सहाय्य दिले जात आहे.
यावेळी बालविकास प्रकल्पाधिकारी किरण सूर्यवंशी, प्रशासनाधिकारी महेश शेंडे, विस्ताराधिकारी बी. के. खेताडे, रतन शिंदे, योगिता लोखंडे, अनुराधा मिस्किन, सरोजिनी बारबोले, सीमा चौधरी तसेच अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. सभापती पंडित देशमुख यांनी महिला व बालकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘लेक लाडकी योजना’, ‘प्रधानमंत्री मातृवंदना योजना’, ‘बाल संगोपन योजना’ यांसह विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com