जयदीप पाटील सुवर्णयुगेश्वर केसरीचा मानकरी
निमगाव केतकी, ता. २८ : सुवर्णयुग गणेश मंदिर ट्रस्ट आणि सुवर्णयुगेश्वर पतसंस्थेच्या २९ व्या गणेश यात्रेनिमित्त भरलेल्या कुस्ती मैदानात कोल्हापूरच्या गंगावेस तालमीच्या जयदीप पाटीलने हरियाणाच्या मलंगला चितपट करत सुवर्णयुगेश्वर केसरी किताब पटकावला. तीन दिवस चाललेल्या यात्रेची सांगता शनिवारी हजारो कुस्ती शौकिनांच्या उपस्थितीत नेत्रदीपक कुस्त्यांनी झाली.
गुरुवारी गणेश मिरवणूक, शुक्रवारी गणेश याग, महाप्रसाद व मनोरंजनाचा कार्यक्रम झाला. कुस्ती मैदानात विजयी मल्ल जयदीपला सुवर्णयुगेश्वर पतसंस्थेच्या वतीने चांदीची गदा, कळस येथील नेचर डिलाईट डेअरीच्या वतीने एक लाख ५१ हजार रुपयांचा इनाम डेअरीचे संचालक केशव हेगडे, सुनील देसाई, संपत कदम यांच्या हस्ते देण्यात आला.
क्रमांक दोन च्या कुस्तीत निमगाव केतकीच्या अभिजित शेंडेने पुण्याच्या शाहरुख पठाणला आसमान दाखवले. अभिजीतला बारामती येथील चंदूकाका सराफ यांच्या वतीने ५१ हजार रुपयांचा इनाम ब्रँच मॅनेजर चरणसिंग बडगुजर व जाकीर शेख यांच्या हस्ते देण्यात आला. क्रमांक तीनच्या कुस्तीत निमगाव केतकीच्या शुभम भोंगने राहुल मुळेवर चमकदार विजय मिळविला.
समर्थ कोकरे, बालाजी खरात, झहीर मुलाणी, तेजस शिंदे, राजू भोंग, कृष्णा सोनार, जितेंद्र वाळकर यांनीही विजय मिळविला. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील मल्लसम्राट रावसाहेब मगर, उद्योजक उत्तमराव फडतरे, उद्योजक वसंत मोहोळकर, ॲड. कृष्णाजी यादव, अजित सोरटे, दशरथ डोंगरे, सरपंच प्रवीण डोंगरे, तात्यासाहेब वडापुरे, गोरख आदलिंग, मारुती मारकड, सागर मारकड यांचा सत्कार करण्यात आला.
कुस्त्या जोडण्याचे काम सचिन चांदणे, सचिन बनकर, अस्लम मुलाणी, शशिकांत सोनार, दत्ता चांदणे, बापू खराडे या वस्ताद मंडळींनी केले. प्रशांत भागवत, प्रवीण ठवरे, सुभाष दिवसे आणि संतोष हेगडे यांनी निवेदन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

