

कोळवण, ता.२५ : कोळवण खोऱ्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या कोळवणचा (ता. मुळशी) पाणीपुरवठा मागील तीन दिवसांपासून पूर्णपणे बंद आहे. वळकी नदीकाठच्या पाणीपुरवठा योजनेचा वीज खांब गंजून धोकादायक स्थितीत वाकल्याने दुरुस्ती करणे अशक्य झाले आहे. ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
येथील नळ पाणीपुरवठा योजनेसाठी वीजपुरवठा करणारा महावितरणचा लोखंडी खांब पूर्णपणे गंजला असून त्याला छिद्रे पडली आहेत. खांब कधीही कोसळण्याच्या स्थितीत असल्याने कंत्राटी कामगार त्यावर चढण्यास धजावत नाहीत. परिणामी, विद्युत बिघाड दुरुस्त न झाल्याने पाणी उपसा थांबला असून गावातील दोन ‘वॉटर एटीएम’ देखील बंद पडली आहेत. महावितरणने पावसाळापूर्व कामांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक करत आहेत. हा धोकादायक खांब बदलून पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.
वीज खांब गंजल्याने वायरमन त्यावर चढू शकत नाही. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी याकडे त्वरित लक्ष देऊन नवीन खांब बसवावा, तरच पाणीपुरवठा सुरू होईल.
- सचिन साठे, माजी पंचायत समिती सदस्य
कोळवण येथील समस्येची माहिती घेतली आहे. गुरुवारी कर्मचारी पाठवून संबंधित गंजलेला व वाकलेला खांब बदलून दिला जाईल.
- आनंद घुले, उपकार्यकारी अभियंता, महावितरण, मुळशी.
03211
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.