मलकापूर दादा शिंगण पत्रक

मलकापूर दादा शिंगण पत्रक
Published on

पाणी बिल, बेकायदेशीर प्रोसिडिंगवर चर्चा

मलकापूर पालिका सभा; दादा शिंगण यांनी उठवला आवाज

मलकापूर, ता. ८ : येथील पालिकेच्या सभेत चोवीस तास पाणीपुरवठा योजना, वाढीव पाणी बिल, बेकायदेशीर प्रोसिडिंग, रखडलेली नळ कनेक्शन तसेच नवीन प्रशासकीय इमारतीस छत्रपती शिवाजी महाराज भवन असे नाव देण्याच्या मागणीच्या मुद्द्यांवर नगरसेवक दादा शिंगण यांनी आवाज उठवला.

नगरसेवक शिंगण यांनी सभेदरम्यान नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांना २९ जानेवारीच्या सर्वसाधारण सभेच्या प्रोसिडिंगबाबत जाब विचारला. त्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात निधन झाल्याने शासनाने तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला होता. त्यामुळे २९ जानेवारीची सभा रद्द होऊन ती दोन फेब्रुवारीला झाली, तरीही २९ जानेवारीचेच प्रोसिडिंग कसे दिले? हा प्रकार बेकायदेशीर असल्याचा आरोप सभागृहात केला.

पाणीपुरवठा अभियंता बागडे यांनी सभागृहात योजनेतील अडचणी वाचून दाखवल्या. सध्या योजनेत मोठ्या प्रमाणात गळती होत असून, सर्वसाधारणपणे २० टक्के पाणी लिकेज होत असल्याचे सांगण्यात आले. प्रथम १५ टक्के गळती कमी करा, मग वाढीव पाणी बिलाचा विचार करू, अशी मागणी केली. सभेत अनेक ठिकाणी हद्दीबाहेर बेकायदेशीर नळ कनेक्शन दिल्याचा आराेप केला. काही नागरिकांकडे अडीच लाख रुपयांपर्यंत थकीत पाणी बिल असूनही त्यांच्यावर कारवाई होत नाही. मीटर काढून आणणे हा उपाय नाही. थकीत रक्कम वसूल करण्यासाठी प्रशासनाकडे ठोस योजना नाही.

मलकापूर नवीन प्रशासकीय इमारतीला छत्रपती शिवाजी महाराज भवन असे नाव देण्याची मागणी केली. या इमारतीला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव न दिल्यास शिवभक्तांच्या वतीने मोर्चा काढण्याचा इशारा दिला.

बांधकाम प्रकल्पातील खुज्या जागा पालिकेच्या नावावर हस्तांतरित करण्यात आली नाही. अशा प्रकल्पाला एनओसी अथवा पूर्णत्व प्रमाणपत्र देऊ नये, असा महत्त्वपूर्ण ठराव सभागृहात मंजूर झाला.
....

दादा शिंगण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com