मलकापूर सर्व्हेक्षण कामाचा शुभारंभ

मलकापूर  सर्व्हेक्षण कामाचा शुभारंभ
Published on

‘प्रधानमंत्री आवास’चा
आज मलकापुरात प्रारंभ

मलकापूर, ता. ९ : आगाशिवनगर झोपडपट्टीसाठी प्रधानमंत्री आवास योजनेच्या अनुषंगाने शासन निर्णयान्वये सर्वेक्षण कामाचा प्रारंभ उद्या (रविवार) आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते सकाळी ९.१५ वाजता आगाशिवनगर झोपडपट्टी येथे होणार आहे, अशी माहिती उपाध्यक्ष मनोहर शिंदे यांनी दिली.
कार्यक्रमास प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार कल्पना ढवळे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास जास्तीतजास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नगराध्यक्ष तेजस सोनावले, बांधकाम सभापती हणमंतराव जाधव, नियोजन व विकास समिती सभापती सूरज शेवाळे, सार्वजनिक आरोग्य व शिक्षण व क्रीडा समिती सभापती धनंजय येडगे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती गीतांजली पाटील, उपसभापती गीता साठे, सर्व नगरसेवक, नगरसेविका, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कपिल जगताप यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com