

लोकवर्गणीतून श्री कुर्मदास विद्यामंदिराच्या नव्या इमारतीचा निर्धार
लऊळ ग्रामस्थ, माजी विद्यार्थी व शिक्षकांचा पुढाकार
कुर्डू, ता. १२ : लऊळ येथील श्री कुर्मदास विद्यामंदिराच्या शाळा इमारतीला जवळपास ४० वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. नव्या सुसज्ज इमारतीची आवश्यकता निर्माण झाली असून, लोकवर्गणी व माजी विद्यार्थ्यांच्या देणगीतून नवीन इमारत उभारण्याचा निर्धार ग्रामस्थ, माजी विद्यार्थी, शिक्षक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी व्यक्त केला आहे.
सध्याची शाळा इमारत त्या काळातील शिक्षकांनी गावोगाव फिरून ज्वारी गोळा करत तसेच दानशूर व्यक्तींच्या मदतीतून उभारली होती. ग्रामस्थांची शिक्षणाविषयीची तळमळ आणि त्याग यामुळेच आज ही संस्था उभी राहिल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. मात्र बदलती शैक्षणिक व्यवस्था, वाढती विद्यार्थी संख्या आणि आधुनिक सुविधा यांमुळे नव्या इमारतीची गरज तीव्रतेने जाणवत आहे.
या विद्यालयातून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज शिक्षक, अधिकारी, शासकीय कर्मचारी, उद्योजक तसेच विविध क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत आहेत. गावातील अनेक कुटुंबांच्या प्रगतीत या विद्यालयाचा मोठा वाटा असल्याची भावना माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. यासाठी शाळेच्या अधिकृत बँक खात्यावर देणगी जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.