कास - सरत्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर एकतीस डिसेंबरला कोयनेतील पर्यटन बंद....

कास - सरत्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर एकतीस डिसेंबरला कोयनेतील पर्यटन बंद....

Published on

वासोटा, कोयनेतील पर्यटन
३१ डिसेंबरला राहणार बंद
कास, ता. २९ : दुर्गप्रेमी, ट्रेकर्ससह पर्यटकांचा आनंद द्विगुणित करणाऱ्या वासोटा किल्ल्यासह कोयना जलाशयाच्या परिसरातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रातील पर्यटनास बुधवारी (ता. ३१) बंदी घालण्यात आली असल्याची माहिती बामणोली वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी विजय बाठे यांनी दिली.
सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागात कोयना अभयारण्य व सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या निसर्गसंपन्न गाभा क्षेत्रात वासोटा किल्ला वसला आहे. या किल्ल्याची ट्रेकर्स, दुर्गप्रेमी, निसर्गप्रेमींसह पर्यटकांना कायमच भुरळ पडते. सुटीच्या दिवशी या किल्ल्यावर पर्यटकांची मांदियाळी दिसून येते. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक ३० डिसेंबर ते एक जानेवारी या कालावधीत वासोटा किल्ला, तसेच अभयारण्य परिसरात येत असतात. त्या पार्श्वभूमीवर या परिसरात पर्यटकांची गर्दी वाढून निसर्ग संपदेला कोणतीही हानी पोचू नये, यासाठी सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांना ३१ डिसेंबरला प्रवेशबंदी करण्यात आली आहे. तशा सूचना कोयना जलाशयातून पर्यटक वाहतूक करणाऱ्या बोटिंग संस्थांना देण्यात आल्या आहेत. गतवर्षी ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव ३० डिसेंबर ते १ जानेवारी असे तीन दिवस पर्यटन बंद ठेवण्यात आले होते; परंतु यावर्षी फक्त एक दिवस ३१ डिसेंबर रोजीच पर्यटन बंद ठेवण्‍यात आले आहे.
....................................................................

Marathi News Esakal
www.esakal.com