यशवंतराव चव्हाण पुरस्काराने बंग दांपत्याचा गौरव

यशवंतराव चव्हाण पुरस्काराने बंग दांपत्याचा गौरव
Published on

मुंबई, ता. १२ : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या ११२व्या जयंतीदिनाचे औचित्य साधून यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे दरवर्षी दिला जाणारा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार बुधवारी वैद्यकीय क्षेत्रातील अमूल्य योगदान देणाऱ्या डॉ. राणी बंग आणि डॉ. अभय बंग यांना सेंटरचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराचे पाच लाख रुपये व सन्मानपत्र असे स्वरूप आहे.
पुरस्कार निवडीचे अध्यक्ष ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सरचिटणीस हेमंत टकले, ज्येष्ठ प्रकाशक रामदास भटकळ, दिनकर गांगल आदी मान्यवर या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होते. प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अरुण गुजराथी यांनी प्रास्ताविक केले. हेमंत टकले यांनी मान्यवरांचे पुस्तक देऊन स्वागत केले. सूत्रसंचालन दत्ता बाळसर्फे यांनी केले. या वेळी अभय बंग आणि राणी बंग यांच्या कार्याची चित्रफीत दाखविण्यात आली. डॉ. राणी बंग या प्रत्यक्ष उपस्थित नसल्याने त्यांचा व्हिडिओ संदेश दाखवण्यात आला.

यशवंतराव चव्‍हाण यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा चेहरा कसा बदलता येईल याचा शेवटपर्यंत प्रयत्न केला. महाराष्ट्रासह देशाला दिशा देणाऱ्या व्‍यक्तीच्या नावाने हा पुरस्कार देण्यात येतो. तो योग्य लोकांनाच मिळेल याची काळजी घेतली जाते. निवडकर्त्यांचा हा अधिकार आहे. या पुरस्कारासाठी बंग दाम्पत्याची निवड झाली याचे समाधान आहे. त्यांचे मनापासून अभिनंदन.
- शरद पवार, ज्येष्‍ठ नेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com