

मंगळवेढा भूमी अभिलेख कार्यालयातील दिरंगाईवर संताप
मंगळवेढा, ता. ११ : येथील भूमी अभिलेख कार्यालयात अनुभवी कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने वारस नोंदी प्रलंबित राहात असून, नागरिकांना कामासाठी वारंवार हेलपाटे घालावे लागत आहेत. त्यामुळे रिक्त पदांवर अनुभवी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष नागेश डोंगरे यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
स्थानिक कार्यक्रमानिमित्त महसूलमंत्री बावनकुळे हे शनिवारी सोलापूर दौऱ्यावर आले असता, त्यांना हे निवेदन देण्यात आले. मंगळवेढा तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयात नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. कार्यालयातील अनेक पदे रिक्त असून, उपलब्ध कर्मचारीही कामकाजात दुर्लक्ष करत आहेत.
विशेषतः वारस नोंदी प्रलंबित ठेवणे, मागणी केलेल्या नकला व अन्य दस्तऐवज वेळेत न देणे, नागरिकांची कामे रखडवून ठेवणे असे प्रकार सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तसेच, कार्यालयातील वरिष्ठ अधिकारीही नागरिकांच्या तक्रारींकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे कार्यालय असून अडचण, नसून खोळंबा अशी अवस्था निर्माण झाली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.