महाबळेश्वरमध्ये बेकायदेशीर परदेशी नागरिकांविरोधात कारवाईची मागणी

महाबळेश्वरमध्ये बेकायदेशीर परदेशी नागरिकांविरोधात कारवाईची मागणी

Published on

बेकायदेशीर वास्तव्यास असलेल्यांवर कारवाई करा

महाबळेश्वरात परदेशी नागरिकांविरोधात भाजपचे पोलिस प्रशासनाला निवेदन

महाबळेश्वर, ता. २९ ः शहर व परिसरात बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असलेल्या, तसेच विविध ठिकाणी काम करणाऱ्या संशयित परदेशी नागरिकांची ओळख पटवून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे महाबळेश्वर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांच्याकडे करण्यात आली आहे.
भाजपचे माजी शहराध्यक्ष राजेंद्र पवार, भाजपचे कामगार मोर्चा पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस सनी मोरे आणि विराज शिर्के यांनी हे निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले, की पोलिस ठाण्याच्या हद्दीत काही संशयित परदेशी नागरिक योग्य कागदपत्रांशिवाय घरगुती कामगार, रिअल इस्टेट व बांधकाम मजूर, रोजंदारीवर काम करणारे, तसेच बेकायदेशीर विक्रेते म्हणून कार्यरत असल्याचे निदर्शनास येत आहे. ही बाब परदेशी कायदा १९४६, पासपोर्ट (भारतात प्रवेश) कायदा १९२०, तसेच भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ व भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) २०२३ मधील तरतुदींचे उल्लंघन करणारी असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने, तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी बेकायदेशीररीत्या भारतात राहणाऱ्या किंवा काम करणाऱ्या परदेशी नागरिकांविरोधात तातडीने कारवाई करणे आवश्यक असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या अनुषंगाने, पोलिस ठाण्याच्या हद्दीत विशेष पडताळणी मोहीम राबवून संशयित परदेशी नागरिकांची कागदपत्रे तपासावीत, वैध पासपोर्ट, व्हिसा किंवा एफआरआरओ नोंदणी नसलेल्या व्यक्तींवर कारवाई करावी, तसेच गरज भासल्यास विशेष शाखा, एटीएस व एफआरआरओशी समन्वय साधावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यासोबतच, बेकायदेशीर परदेशी नागरिकांना रोजगार देणाऱ्यांविरोधातही कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
हे निवेदन कोणत्याही व्यक्तीविरोधात द्वेषातून नसून देशाची सुरक्षा, स्थानिक नागरिकांचे हक्क आणि कायद्याचे राज्य टिकवण्यासाठी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पोलिस प्रशासनाने या निवेदनाची दखल घेऊन योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी अपेक्षा निवेदनकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

--------------------------

04881
महाबळेश्वर : बापूसाहेब सांडभोर यांच्याकडे निवेदन देताना राजेंद्र पवार, सनी मोरे, विराज शिर्के आदी.
-------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com