फाेटो -15453
मालेगाव : येथील सिटी महाविद्यालयात मार्गदर्शन करतांना प्राचार्य डॉ. मृणाल भारद्वाज
----
सिटी महाविद्यालयात
तक्रार समितीविषयी जनजागृती
सकाळ वृत्तसेवा
मालेगाव, ता. १५ : येथील सिटी महाविद्यालयात (स्वायत्त) अंतर्गत तक्रार समिती (आयसीसी)तर्फे ‘अंतर्गत तक्रार समितीचे कार्य’ या विषयावर जनजागृतीपर व्याख्यान झाले.
प्राचार्य डॉ. मृणाल भारद्वाज, रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. आर. बी. सावंत, अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. मीना पाटील यांनी मार्गदर्शन केले.
डॉ. सावंत यांनी अंतर्गत तक्रार समितीची उद्दिष्टे, कार्यपद्धती, तक्रार निवारण प्रक्रिया, गोपनीयता, प्रतिबंधात्मक उपाय तसेच लैंगिक, शाब्दिक, अशाब्दिक आणि डिजिटल छळाचे प्रकार याविषयी माहिती दिली. डॉ. मीना पाटील यांनी सायबर गुन्हे, स्वरक्षण, दामिनी पथक, महिला हेल्पलाइन तसेच सक्षम राहण्याचे महत्त्व सांगितले. प्राचार्य डॉ. मृणाल भारद्वाज यांनी विद्यार्थिनींना आत्मविश्वासाने व मानसिकदृष्ट्या सक्षम राहण्याचे आवाहन केले. आयोजन डॉ. हमदानी रिझवाना यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. प्रा. वृषाली वाडगे, डॉ. जास्मिन, डॉ. फौझिया, प्रा. सदफ, डॉ. इरम, प्रज्ञा देवरे यांनी सहकार्य केले.