

MOH26B03406
पेनूर (ता. माहोळ) ः ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित करण्यात आले, त्यावेळी अधिकारी वर्ग.
पेनूर उपकेंद्रात पाच नवे ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित
साडेचारशेहून अधिक शेतकऱ्यांना दिलासा; वीजपुरवठा होणार सुरळीत
मोहोळ, ता. १० : पेनूर (ता. मोहोळ) येथील महावितरणच्या विद्युत उपकेंद्रात नव्याने बसविण्यात आलेल्या पाच एमव्हीए क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मर सोमवारी कार्यान्वित करण्यात आले. त्यामुळे उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या गावांतील सुमारे साडेचारशे ते पाचशे शेतकऱ्यांना अखंडित व सुरळीत वीजपुरवठा मिळणार आहे.
कुरुल येथील उपविभागीय कार्यालयाचे सहायक अभियंता सुशील देवकर व मोहोळचे सहायक अभियंता नागेश खडतरे यांच्या हस्ते ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण करण्यात आले. पेनूर उपकेंद्रांतर्गत मोठ्या प्रमाणात बागायती क्षेत्र असून ऊस, मका, कांदा यासह द्राक्ष, डाळिंब, पेरू, सीताफळ व केळी पिकांची लागवड आहे. त्यामुळे या भागात विजेची मोठी मागणी असते. मात्र, पुरवठ्यात सातत्याने अडचणी येत असल्याने नवीन ट्रान्सफॉर्मरची मागणी करण्यात आली होती.
‘महाराष्ट्र राज्य कृषी वाहिनी’ योजनेंतर्गत मंजूर झालेला हा ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित झाल्याने शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी दिवसा अतिरिक्त एक तास वीज मिळणार आहे. शेतकऱ्यांनी सिंगल फेज लाईटचा वापर टाळून थ्री फेज वीज वापरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन देवकर यांनी केले.
यावेळी वरिष्ठ सहायक महेश माळी, वरिष्ठ ऑपरेटर तुकाराम खांडेकर तसेच महावितरणचे कर्मचारी उपस्थित होते.
कोट
- नवीन ट्रान्सफॉर्मरमुळे काही भागात पूर्वी सात तास मिळणारी वीज आता आठ तास उपलब्ध होणार आहे. मात्र, शेतकऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत सिंगल फेज वीज वापरू नये.
- सुशील देवकर, सहायक अभियंता, महावितरण, पेनूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.