

शरद पवार यांच्याकडून संगीता साळुंखेंना शाब्बासकीची थाप
मसूर, ता. १० : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या संगीता साळुंखे यांनी नुकतीच खासदार शरद पवार यांची सातारा येथील शासकीय विश्रामगृहात सदिच्छा भेट घेतली. यावेळी सामाजिक, शैक्षणिक तसेच जनहिताच्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
संगीता साळुंखे यांनी जिल्ह्यातील महिलांच्या समस्या, बचत गटांच्या माध्यमातून सुरू असलेले उपक्रम, मुलींच्या शिक्षणासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती श्री. पवार यांना दिली. ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांबाबतही त्यांनी माहिती दिली. महिलांवरील अन्यायाच्या घटनांमध्ये तातडीने मदतीसाठी धावून जाण्याची भूमिका आणि सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या कार्याची दखल श्री. पवार यांनी घेतली.
ग्रामीण भागातील महिलांचे सक्षमीकरण आणि शिक्षण क्षेत्रातील उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक बदल घडत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले, तसेच सामाजिक कार्यात सातत्य ठेवून सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी काम करत राहण्याच्या शुभेच्छाही त्यांनी संगीता साळुंखे यांना दिल्या.
02717
सातारा : शरद पवार यांच्याशी चर्चा करताना संगीता साळुंखे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.