

दारू निर्मितीप्रकरणी तिघांवर गुन्हे
म्हसवड पोलिसांची कारवाई; ३१ हजारांचा मुद्देमाल जप्त
म्हसवड, ता. १० : येथील परिसरात बेकायदेशीर हातभट्टी दारू निर्मितीविरोधात सलग कारवाया करत येथील पोलिसांच्या पथकाने तिघांविरुद्ध गुन्हे दाखल केले. या कारवाईत मोठ्या प्रमाणात हातभट्टी दारू व दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे ३१ हजार रुपये किमतीचे रसायन जप्त केले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, येथील शिंदेमळा परिसरातील ओढ्याच्या कडेला नीलेश बाळू जाधव (रा. म्हसवड) याच्या ताब्यातून १०५ लिटर काढीव हातभट्टी दारू, तसेच ३५० लिटर रसायन असा एकूण १२ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
त्यानंतर कोडलकरवस्ती परिसरात ओढ्याच्या कडेला छापा टाकून बाबा विठ्ठल चव्हाण (रा. म्हसवड) याच्याकडून १०५ लिटर हातभट्टी दारू व ४७५ लिटर रसायन असा एकूण १४ हजार ७५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तिसऱ्या कारवाईत कोडलकरवस्ती येथील ओढ्याच्या खालच्या बाजूस सागर वसंत मंडले (रा. म्हसवड) याच्या ताब्यातून पाच लिटर हातभट्टी दारू व २०० लिटर रसायन असा चार हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी प्रत्येक कारवाईत एकूण तीन गुन्हे येथील पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत.
या तिन्ही कारवाया म्हसवड पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल अनिल वाघमोडे यांच्या फिर्यादीवरून करण्यात आल्या असून, संशयित आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार आर. एल. कुंभार करीत आहेत.
-------------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.