

नागपूर ः मध्य प्रदेशातील कान्हा व्याघ्रप्रकल्प परिसरात ‘कॅनाईन डिस्टेंपर’ या जीवघेण्या विषाणूमुळे एका वाघिणीसह पाच वाघांचा मृत्यू झाल्याच्या धक्कादायक घटनेमुळे देशातील व्याघ्रसंवर्धन व्यवस्थेसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) देशभरातील सर्व व्याघ्रप्रकल्पांना तातडीने सतर्कतेचा इशारा देत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात गेल्या दोन वर्षांपासून श्वानांच्या लसीकरणावर भर दिला जात आहे.