बाबूराव बोत्रे पाटील यांना उद्योग पुरस्कार जाहीर
न्हावरे, ता. २७ : ओंकार शुगर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष बाबूराव बोत्रे पाटील यांना अग्निशपंख फाउंडेशन श्रींगोदा जिल्हा अहिल्यानगर यांच्या वतीने बेस्ट बिझनेस अवॉर्ड जाहीर झाला आहे.
सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव (जि.सातारा) येथे रविवारी (ता. २८) दुपारी साडेतीन वाजता मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. बाबूराव बोत्रे पाटील यांनी अल्पावधीत ओंकार शुगर ग्रुपच्या वतीने महाराष्ट्रात बंद पडलेले १७ साखर कारखाने चालवण्यासाठी घेतले ते यशस्वीरीत्या चालवत आहेत. प्रत्येक कारखान्याकडे गळितासाठी आलेल्या उसापोटी शेतकऱ्यांना १५ दिवसांच्या आत पेमेंट केले जाते, त्याचबरोबर कामगारांना पाच तारखेच्या दरम्यान पगार केला जातो. या १७ कारखान्याच्या माध्यमातून ओंकार ग्रुपला ८ लाख शेतकरी व २ लाखांपेक्षा अधिक वाहतूकदार जोडले गेले आहेत. तर १६ हजारांपेक्षा अधिक कर्मचारी या ग्रुपमध्ये काम करीत आहेत. एकूणच संस्था, शेतकरी , कामगार, वाहतूकदार व पुरवठादार यांना केंद्र बिंदुमानून काम करीत असल्यामुळे संस्था प्रगतिपथावर असल्याची माहिती बोत्रे पाटील यांनी दिली.

