NSK26H24073
जळगाव : दशरथ नगरात वेलीने वेढलेला वीज खांब.
---
NSK26H24074
विघ्नहर्ता चौकाजवळील डीपीला बसलेला वेलींचा वेढा.
----
दशरथ नगरात वेलींनी वेढले विजेचे खांब
डीपीभोवतीही झाडाझुडपांची समस्या; वीजप्रवाह उतरण्याचा धोका
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.१६ : दशरथ नगर परिसरातील कृष्णा अपार्टमेंटजवळील वीज खांब वेलींनी पूर्णपणे वेढले गेले असून, पावसाळ्यात या ठिकाणी वीजप्रवाह उतरण्याचा धोका निर्माण झाला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संबंधित यंत्रणांनी तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.
परिसरातील वीजखांबांवर वाढलेल्या वेलींमुळे तारांशी संपर्क येण्याची शक्यता असून, पावसाचे पाणी आणि ओलाव्यामुळे धोका आणखी वाढू शकतो. या मार्गावरून नागरिकांची सतत ये-जा सुरू असते. त्यामुळे एखादी दुर्घटना घडण्यापूर्वी वेलींची छाटणी करून विद्युत व्यवस्था सुरक्षित करावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, विघ्नहर्ता चौकाजवळील डीपीभोवतीही वेलींनी वेढा घातला आहे. डीपी परिसर मोकळा ठेवणे आवश्यक असताना येथे वाढलेल्या झाडाझुडपांमुळे देखभालीत अडथळे येत आहेत.
चौकट
तातडीने उपाययोजनेची गरज
उघड्या आणि असुरक्षित विद्युत यंत्रणेमुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. शहरातील अशा धोकादायक ठिकाणांची पाहणी करून वीज वितरण कंपनी आणि संबंधित प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी दशरथ नगर परिसरातील नागरिकांकडून होत आहे.