टुडे ३ ॲंकर
NSK26H24169
जळगाव : ‘आषाढस्य प्रथम दिवसे’च्या आौचित्याने बुधवारी परिवर्तनतर्फे मंगेश पाडगावकरांच्या कवितांचे सादरीकरण करण्यात आले, त्याप्रसंगी उपस्थित गायक कलावंत व निवेदक.
--------
‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे..’
उपशीर्षक
‘आषाढस्य प्रथम दिवसे’ कार्यक्रमास रसिकांची उत्स्फूर्त दाद
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १६ : ‘भातुकलीच्या खेळामधली’, ‘या जन्मावर या जगण्यावर’ यासारख्या बहारदार गीतकाव्यांची मेजवानी असलेल्या ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ कार्यक्रमांना रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. परिवर्तनतर्फे बुधवारी त्यानिमित्त मंगेश पाडगावकरांच्या कवितांचे सादरीकरण करण्यात आले. परिवर्तनचा हा रौप्य महोत्सवी कार्यक्रम होता. ‘तुझे गीत गाण्यासाठी’ या संकल्पनेंतर्गत या कार्यक्रमाची निर्मिती परिवर्तनतर्फे करण्यात आली.
सुरवातीला समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील, राजेंद्र कांबळे, सुदीप्ता सरकार, पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता एस. पी. चव्हाण यांच्या हस्ते संत तुकारामाची गाथा व ज्ञानेश्वरी या अभिजात काव्य ग्रंथांना नमन करून, फुले अर्पण करून उद्घाटन करण्यात आले. सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक मंजूषा भिडे यांनी केले.
----
या कविता, गीतांचे सादरीकरण
गांधीजी, ख्रिस्त, माणूस शोधतो मी, विठोबा, भातुकलीच्या खेळामधली, जमा खर्च, श्रावणात घननिळा, टप टप पडती, प्रेम म्हणजे, सावर रे, सलाम, या जन्मावर या कविता आणि गाणी सादर करण्यात आली. गायिका अंजली धुमाळ यांनी आपल्या सुमधूर आवाजात गाणी सादर केली.
चौकट
या कलावंतांचा सहभाग
अक्षय नेहे, मानसी गगडाणी, लीना लेले, अनघा गगडाणी, मानसी जोशी, शंभू पाटील या कलावंतांनी कवितांचे सादरीकरण करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाची संकल्पना डॉ. किशोर पवार यांची, दिग्दर्शन डॉ. मनोज पाटील, निर्मिती प्रमुख श्वेतांबरी गरुड व समृद्धी पाटील यांचे होते. हर्षल पाटील यांनी बहारदार निवेदन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राहुल निंबाळकर, गणेश सोनार आदींनी परिश्रम घेतले
------