(धुळे- नंदुरबार मुख्य पानासाठी) अँकर
--
फोटो क्रमांक : 24114
धुळे : एस.व्ही.के.एम. महाविद्यालय इमारत.
--
धुळे एस.व्ही.के.एम.ला कॉपीराइटसह डिझाईन पेटंट!
--
मेकॅनिकल विभागातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय पातळीवर यश
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १६ : येथील नामांकित एस. व्ही. के. एम. अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल अभियांत्रिकी (एनबीए मानांकन प्राप्त) विभागातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी आपल्या उत्कृष्ट संशोधन वृत्तीच्या बळावर राष्ट्रीय पातळीवर यश संपादन केले आहे. प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे विकसित केलेल्या ‘डबल पास सोलर एअर हीटरची बहु-वैशिष्ट्यपूर्ण आणि कॉन्फिगर करण्यायोग्य प्रायोगिक मांडणी’ या नाविन्यपूर्ण संशोधन प्रकल्पाला भारत सरकारच्या कॉपीराइट कार्यालयाकडून अधिकृत कॉपीराइट प्रदान करण्यात आला आहे.
या राष्ट्रीय बहुमानामध्ये महाविद्यालयातील तज्ज्ञ प्राध्यापक भूषण बेहेडे, योगेश सोनवणे आणि दत्तात्रय दोईफोडे यांनी योगदान देत संशोधन क्षेत्रात महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे. या संशोधन कार्यात विद्यार्थ्यांनेही सक्रिय सहभाग नोंदवला. यामध्ये एकूण २० विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. संशोधनात विद्यार्थ्यांमध्ये नितांशु अमृतकर, चिरायु नागरे, प्रेमराज पाटील, गुंजन देवरे, ओजस भडगे, अनुजा मोरे, प्राची शिरसाठ, नेहा पाटील, दिया साळुंखे, स्नेहा शिरुडे, मनिष पाटील, प्रतीक पाटील, जयेश पटेल, जयेश बागुल, परेश चौधरी, ललित कदम, मोहित पाटील, गौरव पाटील, दुर्गेश खैरनार आणि ज्ञानेश्वर पाटील या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
-
सांडपाणी व्यवस्थापनासाठी पेटंट
या यशासोबतच महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. विभागातील विद्यार्थिनी प्रियांका पाटील आणि श्वेता पाटील यांनी मिळून विकसित केलेल्या ''केराटिन-आधारित सांडपाणी गाळण उपकरण'' या पर्यावरणपूरक संकल्पनेची भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून ‘डिझाईन पेटंट’ म्हणून अधिकृत नोंदणी करण्यात आली आहे. सांडपाणी व्यवस्थापनाच्या क्षेत्रात हे संशोधन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल एस.व्ही.के.एम. संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, सहअध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष चिंतनभाई पटेल, एसव्हीकेएम एनएमआयएमएस ग्लोबल युनिव्हर्सिटी चान्सलर स्नेहा पारेख, व्यवस्थापन समिती सदस्य राजगोपाल भंडारी, धुळे कॅम्पस चेअरमन संजय अग्रवाल, मार्गदर्शक अजय पसारी आणि प्राचार्य निलेश साळुंखे यांनी सर्व संशोधकांचे कौतुक केले.