NSK26H24171
पंढरपूर : आषाढी एकादशीच्या वारीनिमित्त गुरुवारी श्रीक्षेत्र विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात विठ्ठलाचे दर्शन घेताना पालकमंत्री गुलाबराव पाटील व मान्यवर.
--------
बळीराजा, वारकरी, जनतेवर कृपादृष्टी राहू दे..!
उपशीर्षक
पालकमंत्री पाटील पंढरपुरात; विठुमाऊलीला घातले साकडे
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १६ : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आषाढी वारीनिमित्त दरवर्षीच्या परंपरेनुसार यंदाही पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात जाऊन विठू माऊलीचे भक्तिभावाने दर्शन घेतले. विठ्ठलचरणी नतमस्तक होत त्यांनी राज्यातील शेतकरी, वारकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या सुख-समृद्धीसाठी तसेच भरघोस पाऊस पडून बळीराजा आनंदी राहावा, अशी प्रार्थना केली.
दर्शनानंतर पत्रकारांशी संवाद साधताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची, भक्तीची आणि समतेची अखंड परंपरा आहे. विठ्ठलाच्या चरणी आले की मनाला नवी ऊर्जा, समाजसेवेची नवी प्रेरणा आणि जनतेसाठी अधिक काम करण्याची ताकद मिळते. मंदिर परिसरात त्यांनी वारकऱ्यांशी आत्मीयतेने संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी मंदिराचे विश्वस्त संभाजी शिंदे यांच्याहस्ते गुलाबराव पाटील यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी पंढरपूर नगराध्यक्षा प्रणिती भालके, कैलास पाटील, मोतीआप्पा पाटील यांच्यासह मंदिर समितीचे पदाधिकारी, मान्यवर व अनेक भाविक उपस्थित होते.
----------