कुलगुरू युवा प्रेरणा शिबिर

कुलगुरू युवा प्रेरणा शिबिर
Published on
टुडे ४ ॲंकर NSK26H24179 जळगाव : कुलगुरू युवा प्रेरणा शिबिराच्‍या समारोपप्रसंगी बोलताना महापौर दीपमाला काळे. शेजारी कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, नितीन झाल्टे, प्राचार्य शिवाजी पाटील, वित्त व लेखा अधिकारी रवींद्र पाटील आदी. संवेदनशीलता, राष्ट्रभक्ती, सेवाभाव मूल्ये जोपासण्याची गरज (उपशीर्षक) महापौर दीपमाला काळे : विद्यापीठात कुलगुरु युवा प्रेरणा शिबिराचा समारोप सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १६ : विकसित भारत २०४७ हे केवळ शासनाचे स्वप्न नसून प्रत्येक युवक- युवतीचे राष्ट्रीय ध्येय आहे. त्या दिशेने वाटचाल करण्यासाठी विद्यार्थ्यांनी ज्ञान, कौशल्य, शिस्त, प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकी हे गुण अंगीकारणे अत्यावश्यक आहे. शिक्षणाबरोबरच संवेदनशीलता, पर्यावरणप्रेम, राष्ट्रभक्ती आणि सेवाभाव या मूल्यांची जोपासना केली तरच सक्षम आणि आत्मनिर्भर भारत घडेल, असा विश्‍वास महापौर दीपमाला काळे यांनी आज येथे व्‍यक्‍त केला. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे आयोजित विद्यापीठस्तरीय ''कुलगुरू युवा प्रेरणा शिबिर-२०२६'' चा शिबीराचा समारोप आज (ता. १६) विद्यापीठात झाला. यावेळी महापौर काळे बोलत होत्‍या. कार्यक्रमाला कुलगुरु प्रा. व्ही. एल. माहेश्वरी अध्यक्षस्‍थानी होते. तर व्यवस्थापन परिषद सदस्य नितीन झाल्टे, प्राचार्य शिवाजी पाटील, वित्त व लेखा अधिकारी रवींद्र पाटील, अधिसभा सदस्य प्रा. कांचन महाजन, स्वप्‍नाली काळे, भानुदास येवलेकर, सल्लागार समितीचे सदस्य प्राचार्य एस. टी. सोनवणे, डॉ. प्रवीण महाले उपस्थित होते. यावेळी युवा शिबिरात उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून विद्यार्थी पुरुषोत्तम भोसले (गंगामाई महाविदयालय नगाव) व वेदिका भोसले (जी.जी. खडसे महाविद्यालय, मुक्ताईनगर) यांना पुरस्कार देण्यात आले. चौकट आधुनिक तंत्रज्ञान प्रगतीचे आधारस्तंभ : कुलगुरु प्रा. माहेश्र्वरी कुलगुरू प्रा. व्ही. एल.माहेश्वरी यांनी शिबिरातून विद्यार्थ्यांनी श्रमसंस्कार, सामाजिक उत्तरदायित्व, पर्यावरण संरक्षण, नेतृत्व, शिस्त आणि सामूहिक कार्याची मूल्ये आत्मसात केली आहेत. भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सायन्स, रोबोटिक्स आणि आधुनिक तंत्रज्ञान हे जगाच्या प्रगतीचे प्रमुख आधारस्तंभ ठरणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नव्या तंत्रज्ञानाचे ज्ञान मिळवून स्वतःला जागतिक स्पर्धेसाठी सक्षम बनवावे, असे आवाहन केले. ––––––––––

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com