धुळे : टुडे पान ३ साठी..
--
साक्रीतील नांद्रे चित्रकला
विद्यालयाचा शंभर टक्के निकाल
--
शासकीय उच्च कला परीक्षेत निकालाची परंपरा कायम
सकाळ वृत्तसेवा
साक्री, ता. १६ : मुंबईस्थित कला संचालनालय आणि महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ यांच्या वतीने घेण्यात आलेल्या शासकीय उच्च कला परीक्षेत येथील जी. के. नांद्रे चित्रकला महाविद्यालयाने पुन्हा एकदा शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी फाउंडेशन कोर्सपासून ते थेट प्रगत डिप्लोमा स्तरापर्यंतच्या सर्वच वर्गांमध्ये यश मिळवले आहे.
घोषित झालेल्या निकालात फाउंडेशन सर्टिफिकेट इन आर्ट डिझाईनमध्ये अश्विनी हिरे (प्रथम), पौर्णिमा डांगे (द्वितीय). एटीडी प्रथम वर्षमध्ये अनिल वळवी (प्रथम), मनोज वळवी (द्वितीय), सुरज अहिरे (तृतीय), द्वितीय वर्षात धनश्री देवरे व मंगेश जाधव (प्रथम), सोनाली जाधव व गीता वळवी (द्वितीय), योगिता चौधरी व जानवी नेरकर (तृतीय), जीडी आर्ट इंटर पेंटिंगमध्ये पल्लवी महाले व इंद्रसिंग वळवी (प्रथम), हेमानी शेवाळे (द्वितीय), सीमा जोशी (तृतीय). जीडी आर्ट ऑड पेंटिंगमध्ये चैताली पाटील (प्रथम), जीडी आर्ट डिप्लोमा पेंटिंगमध्ये योगिता व्हाटुळे (प्रथम), शाहू पवार (द्वितीय), प्रसाद पूरकर (तृतीय). महाविद्यालयातील इतर सर्व विद्यार्थ्यांनीही या परीक्षेत यश मिळवले. या यशाबद्दल महाविद्यालयाचे संस्थाचालक डी. जी. पाटील, प्राचार्य सुधीर कासार, प्रा. युवराज भोसले, वसुमती काकुस्ते, राहुल पाटील, योगेश सोनवणे, कार्यालयीन कर्मचारी सतीश पेंढारकर, शरद चव्हाण, प्रशांत भावसार आणि उत्तमराव सोनवणे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.