श्रीराज नांद्रे

श्रीराज नांद्रे
Published on
धुळे : टुडे पान ३ साठी.. -- फोटो क्रमांक : 24180 - श्रीराज नांद्रे -- साक्रीच्या सुपुत्राची आयआयटीत झेप -- जेईई परीक्षेत श्रीराज नांद्रेचे यश सकाळ वृत्तसेवा साक्री, ता. १६ : मूळचे छडवेल पखरून (ता. साक्री) येथील नांद्रे परिवारातील श्रीराज राकेश नांद्रे याने देशातील सर्वात प्रतिष्ठित आणि अत्यंत स्पर्धात्मक मानल्या जाणाऱ्या ‘जेईई ॲडव्हान्स २०२६’ परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून साक्री तालुक्याचा गौरव वाढवला आहे. या यशामुळे त्याचे मंडी (हिमाचल प्रदेश) येथे भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) ‘मटेरियल्स सायन्स ॲन्ड इंजिनिअरिंग’ या शाखेत प्रवेश निश्चित झाला आहे. श्रीराजने बारावी विज्ञान शाखेनंतर जेईई मेन्स परीक्षेत ऑल इंडिया रँक आणि जेईई ॲडव्हान्स परीक्षेत ऑल इंडिया रँक मिळवून देशातील गुणवंतांमध्ये स्थान मिळवले. विशेष म्हणजे त्याने दमन- सिल्वासा परिसरात प्रथम, तर दमन-वापी-सिल्वासा विभागात तृतीय क्रमांक पटकावला आहे. श्रीराजचे वडील राकेश नांद्रे हे दमन येथे बहुराष्ट्रीय कंपनीत वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत. ते स्वातंत्र्यसैनिक दामू नांद्रे यांचे नातू व भाडणेस्थित पांझर सहकारी साखर कारखान्याचे माजी कर्मचारी भास्कर नांद्रे यांचे सुपुत्र आहेत. या प्रवासात श्रीराजला आई मीनाक्षी नांद्रे यांचे प्रोत्साहन लाभले. ग्रामीण भागातून पुढे येत कठीण कौटुंबिक व शैक्षणिक संघर्षातून मिळवलेले हे यश प्रेरणादायी ठरत आहे. त्याच्या या यशाबद्दल लायन्स इंटरनॅशनल, मराठा सेवा संघ, मराठी सांस्कृतिक मंडळ दमन, स्वामी समर्थ परिवार, आयआयएमएम वापी या विविध सामाजिक संस्था व मित्रपरिवाराकडून त्याचे कौतुक झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com