धुळे टुडे २ साठी...
---
फोटो-NSK26H24176
बदलापूर : नवनिर्वाचित उपनगराध्यक्षा प्रियंका दामले यांचा सत्कार करतांना धुळे जिल्हा परशुराम युवा मंचचे पदाधिकारी.
---
बदलापूरच्या उपनगराध्यक्ष
प्रियंका दामले यांचा सत्कार
---
परशुराम युवा मंचतर्फे सन्मान
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १६ : परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांच्या पत्नी तथा बदलापूर नगर परिषदेच्या नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष प्रियंका दामले यांचा धुळे जिल्हा परशुराम युवा मंचतर्फे बदलापूर येथे नुकताच सत्कार करण्यात आला.
मंचच्या वतीने श्रीमती दामले यांना शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. धुळे जिल्हा परशुराम युवा मंचचे अध्यक्ष भूषण जोशी यांनी श्रीमती दामले यांच्या माध्यमातून बदलापूर शहरात अधिक लोकाभिमुख कामे होतील असा विश्वास यावेळी व्यक्त केला. याप्रसंगी सखी मंचच्या अध्यक्षा भारती जोशी, अश्विनी जोशी, रेखा कुलकर्णी, वीरा देव, वासंती दीक्षित, जागृती पंचभाई, कल्याणी जोशी, पल्लवी पुराणिक, सुषमा मोतीवाले, पूर्वी चंद्रात्रे, वर्षा कुलकर्णी, भावना शेंद्रे, प्रणाली पंचभाई, स्वाती राव यांच्यासह धुळे जिल्ह्यातील परशुराम युवा मंचाचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
---