पारदर्शक, कार्यक्षम ग्रामसेवक

पारदर्शक, कार्यक्षम ग्रामसेवक

ग्रामपंचायत हा ग्रामविकासाचा पाया आहे. गावांचा सर्वांगीण विकास करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य सरपंच व ग्रामसेवक करत असतात. ‘ग्रामविकास आणि कृषिविकास’ या दोन्ही गोष्टी डोळ्यासमोर ठेवून गावांची विकासाच्या दिशेने वाटचाल व्हावी व नवनवीन शासकीय योजना गावातील नागरिकांपर्यंत पोचवण्यासाठी सदैव प्रयत्नशील असलेले शांत, संयमी, मितभाषी, पारदर्शक कामकाज करणारे कर्तव्यदक्ष ग्रामसेवक म्हणून चेतन वाव्हळ लोकांना परिचित आहेत. अत्यंत कार्यक्षम आणि कर्तव्यनिष्ठ असे ग्रामविकास अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
-चेतन वाव्हळ, ग्रामविकास अधिकारी, सविंदणे

प्रशासकीय सेवेमध्ये रुजू होऊन त्या माध्यमातून जनसामान्यांची सेवा करायची हे ध्येय उराशी बाळगून प्रशासकीय सेवेत काम करत असलेले चेतन वाव्हळ कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून लोकांना परिचित आहे. सध्या ते शिरूर तालुक्यातील सविंदणे व कवठे यमाई येथे ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात मलठण या गावी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात चेतन मारुती वाव्हळ यांचा जन्म झाला. त्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेतून प्राथमिक शिक्षण व न्यू इंग्लिश स्कूल मलठण येथून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर अध्यापक विद्यालय अरणेश्वर पुणे येथून डि. एड व बी. एड पूर्ण केले.

यशाची शिखरे पादाक्रांत
वडील मारुती वाव्हळ हे शिक्षक असल्याने त्यांनी मुलांवर उत्तम संस्कार केले. आपल्या दोन्ही मुला-मुलींनी उच्च शिक्षण घेऊन उच्च पदस्थ अधिकारी व्हावे असे त्यांना मनोमन वाटत होते. ते जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून सेवा बजावत आहेत. त्यांच्या पत्नी नंदा या शेती व कौटुंबिक जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांनी प्रचंड कष्ट घेऊन आपल्या मुलाला व मुलीला उच्चशिक्षित केले. दोघांनीही आई वडिलांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवून यशाची शिखरे पादाक्रांत केली. चेतन वाव्हळ हे लहानपणापासून अभ्यासात हुशार होते. वडील शिक्षक असल्यामुळे घरात शिक्षणमय वातावरण होते. त्यामुळे त्यांना ही शिक्षक होण्याची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी डि. एड व बी. एड. पूर्ण केले. त्यासोबतच विविध परीक्षा देत असताना २०१२ला ग्रामसेवक भरतीचा पेपर दिला अन् उत्तम गुण मिळवत ग्रामसेवक पदाला गवसणी घातली. त्यांची बहीण प्रियांका यांनीही ग्रामसेवक भरतीच्या परिक्षेत उत्तम गुण मिळवत ग्रामसेवक पद मिळवले.

ग्रामसेवक म्हणून १२ वर्षे सेवा
चेतन हे १५ मार्च २०१२ला ग्रामसेवक म्हणून रायगड जिल्ह्यात महाड येथे रुजू झाले. त्यांनी रायगड जिल्ह्यातील महाड, दहिवड, निगडी, रानवडी खुर्द या ठिकाणी ग्रामसेवक म्हणून ५ वर्ष कामगिरी बजावली. तेथे गावात रस्ते, वीज, पाणी, आरोग्य सुविधा, पोषण आहार, महिला व बालकल्याण याबाबत विशेष कामकाज केले. एप्रिल २०१७ मध्ये पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात बदली झाली. त्यानंतर शिरूर तालुक्यातील फाकटे, कासारी, वडनेर खुर्द, मोराची चिंचोली, चांडोह, निमगाव दुडे, कवठे येमाई, सविंदणे या गावांत सेवा बजावली. त्यांनी जवळपास १२ वर्ष ग्रामसेवक म्हणून कामकाज केले. सध्या शिरूरचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी महेश डोके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सविंदणे, कवठे येमाई येथे ग्रामसेवक म्हणून कामकाज करत आहेत.

केलेली उल्लेखनीय कामे
• ग्रामपंचायतींचे अंदाजपत्रक तयार करणे.
• ग्रामपंचायतीचे दफ्तर सांभाळणे.
• गावातील लोकांना आरोग्य, शेती, ग्रामविकास, शिक्षण इत्यादींबाबत सल्ला देणे.
• कोरोना कालावधीत शासनाच्या नियमावलीनुसार कामकाज करून गावातील लोकांच्या आरोग्याची काळजी घेणे.
• लोकांना ग्रामविकासाच्या वेगवेगळ्या शासकीय योजनांची माहिती देणे. करवसुल करणे.
• लोकांना विविध प्रकारचे दाखले देणे.
• जन्म-मृत्यू, उपजतमृत्यू नोंदणी निबंधक अधिकारी म्हणून काम पाहणे.
• जनमाहिती अधिकारी कामकाज करणे.
• विवाह नोंदणी निबंधक कामकाज करणे.
• झाडे लावणे, शौचालय बांधून ते वापरण्याबाबत जनजागृती करणे.
• ग्रामसभेचा सचिव म्हणून कामकाज करणे. इत्यादी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com