इंदिरानगर मधील "त्या" बॅडमिंटन हॉल ला महापालिकेतर्फे कुलूप

इंदिरानगर मधील "त्या" बॅडमिंटन हॉल ला महापालिकेतर्फे कुलूप
Published on
फोटो : B12296 इंदिरानगर : तक्रारीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने सील केलेला श्रद्धाविहार येथील बॅडमिंटन हॉल. -- ‘त्या’ बॅडमिंटन हॉलला महापालिकेकडून कुलूप नागरिकांच्या तक्रारीमुळे १ जुलैला प्रशासनाकडून कारवाई इंदिरानगर, ता. १६ : प्रभाग क्रमांक ३० मधील श्रद्धाविहार येथील सर्व्हे नंबर ‌‌१०४ मध्ये असलेल्या बॅडमिंटन हॉलबाबत स्थानिक नागरिकांनी तक्रार केल्यामुळे १ जुलैलाच सील केल्याची बाब समोर आली आहे. अमित बुडुक, योगेश शिंदे, राहुल जाधव, सुहास कोल्हे, डॉ. वैभव भालेराव, चंद्रकांत निकम, राजेंद्र बाल्टे, प्रकाश दुशिंग आदींसह २०० नागरिकांनी सह्या करून पूर्व विभाग विभागीय अधिकाऱ्यांना २९ जूनला दिलेल्या पत्रात याबाबत तक्रार दिली आहे. त्यानुसार हा बॅडमिंटन हॉल महापालिकेचा कोणताही ठराव नसतांना बेकायदेशीरपणे एका व्यक्तीकडून चालविला जात आहे. विशेष म्हणजे यासाठी महापालिकेची कोणतीही परवानगी घेतलेली नाही. त्यामुळे ३ वर्षांपासून मनपाचे आर्थिक नुकसान होत आहे. श्रद्धाविहार येथील नागरिकांना सदर हाॅल हा खेळण्यासाठी दिला जात नसून, रात्री ११ ते १२ वाजेपर्यंत येथे बाहेरच्या व्यक्तींकडून या बॅडमिंटन हाॅलचा गैरवापर होत आहे. नागरिकांना अपमानास्पद वागणूक मिळत आहे. याची गंभीर दखल घेण्याची मागणी करण्यात आली. सदर हॉलचे व्यवस्थापन स्थानिक नागरिक करण्यास तयार असून स्थानिक नागरिकांना व खेळाडूंना त्याचा उपयोग होण्यासाठी ही वास्तू देखभालीसाठी स्थानिक नागरिकांच्या ताब्यात द्यावी, अशी विनंतीदेखील करण्यात आली आहे. या पत्राची दखल घेत पूर्व विभागातर्फे हॉल सील केला असून, येथील सर्व प्रशिक्षण वर्ग बंद केले आहेत. -- चौकट श्रद्धाविहार कला, क्रीडा मंडळातर्फे विलास टिळे आणि सहकाऱ्यांनी महासभेत चर्चेसाठी येणाऱ्या ठराव क्रमांक ५१४ च्या अनुषंगाने हा हॉल दुसऱ्या एका सामाजिक संस्थेला देखभालीसाठी हस्तांतरित करण्याच्या विषयाला महापौरांना निवेदन देऊन विरोध केला आहे. यावर आता स्थानिक नगरसेवक ॲड. श्याम बडोदे, ॲड. अजिंक्य साने, सुप्रिया खोडे आणि डॉ. दीपाली कुलकर्णी काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com