

पाईट, ता. ९ : निष्काळजीपणे वाहन चालवून दुचाकीस्वाराच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी राहुल सोपान हजारे (रा. कन्हेरसर, ता. खेड) याला पाच वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. राजगुरुनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. एस. सय्यद यांनी हा निकाल दिला.
याबाबत अधिक माहिती अशी की, २ ऑगस्ट २०१७ रोजी गोसासी (ता. खेड) गावच्या हद्दीत आरोपी राहुल हजारे याने आपली कार (एमएच १४ एफसी ५३५७) भरधाव वेगात चालवून एका ट्रॅव्हल्स बसला आणि त्यानंतर संजय राजाराम पवळे (रा. रेटवडी) यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली होती. या भीषण अपघातात पवळे यांचा मृत्यू झाला होता. सत्यवान शिवराम काळे यांनी याप्रकरणी खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
सहायक पोलिस निरीक्षक आदित्य लोणीकर यांनी या गुन्ह्याचा तपास केला. खटल्यादरम्यान सरकारी वकील संदीप वाघ यांनी सहा साक्षीदार तपासले. यात तीन प्रत्यक्षदर्शींची साक्ष अत्यंत महत्त्वाची ठरली. पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली. पोलिस उपनिरीक्षक सुनील सोळसकर आणि न्यायालयीन पैरवी आर. एस. जाधव यांनी न्यायालयीन कामकाजात सहकार्य केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.