‘व्हॉटसअप’च्या जादूमुळे रूसलेला मुलगा सुखरूप !
कोथरुड, ता. २८ ः आईने केलेली शिक्षा जिव्हारी लागल्याने कोणालाही न सांगता घर सोडून थेट राजस्थानला जाणारा मुलगा व्हॉटसअपच्या ‘जादू’मुळे पालकांना पुन्हा मिळाला. समाजमाध्यमाची ही ताकद बघून पालकांचा जीव भांड्यात पडला. ही घटना कोथरूडमधील मुलाबाबत घडली.
शिकवणी वर्गाला जातो म्हणून दुपारी घरातून बाहेर गेलेला मुलगा परत न आल्याने चिंतित झालेल्या आईने चालकांना फोन केला. मात्र, तो क्लासमध्ये आलाच नव्हता, हे कळल्याने सगळेच चिंतित झाले. रात्रभर शोध मोहीम सुरु झाली. पोलिसांनी देखील तपास सुरु केला. मात्र, रात्री उशिरापर्यंत मुलाचा काहीही शोध लागला नाही.
सागर शेडगे यांनी सांगितले की, आम्ही मुलाच्या पालकांना सुचवले की, तुम्ही त्याचा फोटो आणि माहिती तयार करून संपर्कातील सर्व व्हॉटसॲप ग्रुपवर, मित्र, नातेवाइकांना पाठवा. त्याचा उपयोग होऊ शकतो. योगायोग असा की, दुसऱ्या दिवशी सकाळी दहाला पालकांना फोन आला की, तुमचा मुलगा राजस्थानला जाणाऱ्या रेल्वेगाडीमध्ये आहे. या माणसाने व्हॉटसॲपवर मिळालेली माहिती पाहिली. तेव्हा त्याला त्याच्याजवळच तो मुलगा बसलेला आढळला. त्याने मिळालेल्या नंबरवर व्हिडिओ कॉल करत मुलगा सुखरूप असल्याचे कळवले. मुलाला जोधपूर रेल्वे स्थानकावर जाऊन नातेवाइकांनी ताब्यात घेतले. राजस्थानमध्ये त्याचे आजी आजोबा आहेत. त्यांच्याकडे रेल्वेने जायचे म्हणून तो राजस्थानकडे जाणाऱ्या रेल्वेत बसला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.