संस्कृत भाषा भारतीय संस्कृतीचा आत्मा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संस्कृत भाषा भारतीय संस्कृतीचा आत्मा
संस्कृत भाषा भारतीय संस्कृतीचा आत्मा

संस्कृत भाषा भारतीय संस्कृतीचा आत्मा

sakal_logo
By

पुणे, ता. ९ ः ‘‘संस्कृत भाषा अतिशय समृद्ध आहे. अपार ग्रंथ संपदा या भाषेमध्ये आहे. संगीत, नाट्य या कला संस्कृत साहित्याने समृद्ध आहेत. संस्कृत भाषा ही भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे. त्यामुळे संस्कृतचा मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार व्हायला हवा’’, असे मत ज्येष्ठ संस्कृत प्राध्यापिका जयश्री साठे यांनी सोमवारी व्यक्त केले.

सांस्कृतिक कार्य संचलनालयातर्फे आयोजित ६१ व्या संस्कृत राज्य नाट्य स्पर्धेच्या पुणे केंद्रावरील अंतिम फेरीचे उद्‍घाटन साठे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. स्पर्धेची सुरुवात दीप प्रज्वलनाने आणि नटराज पूजनाने झाली. याप्रसंगी परीक्षक शिवानी कोटिभास्कर, प्रणव चौसाळकर, संदीप ढीकळे तसेच सांस्कृतिक कार्य संचलनालयाच्या सहसंचालिका सुनिता असावले उपस्थित होत्या.

‘शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी, तरुणांनी स्पर्धा बघायला यावे, त्यात सहभाग नोंदवावा. प्रेक्षक स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने येतील, यासाठी प्रयत्न करायला हवेत. शासनानेदेखील यासाठी स्पर्धेची जाहिरात करायला हवी’, अशी सूचना साठे यांनी केली. सहसमन्वयक सई साठे हिने उद्‍घाटन समारंभाचे सूत्रसंचालन केले. पहिल्या दिवशी चिंचवडच्या व्ही. के. माटे हायस्कूलचे ‘मेलनं इतिहासेन सह।’ व स. प. महाविद्यालयाचे ‘संङ्गीत सौभद्रम्।’ ही दोन नाटके सादर झाली. शनिवारपर्यंत (ता. १४) दररोज सायंकाळी ५ ते ९ या वेळेत कोथरुड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात या फेरीतील नाटकांचे सादरीकरण होणार आहे.