आंत्रप्रिनर्सला मिळाला यशस्वी होण्याचा मंत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंत्रप्रिनर्सला मिळाला यशस्वी होण्याचा मंत्र
आंत्रप्रिनर्सला मिळाला यशस्वी होण्याचा मंत्र

आंत्रप्रिनर्सला मिळाला यशस्वी होण्याचा मंत्र

sakal_logo
By

पुणे, ता. २३ : स्टार्टअप सुरू केल्यानंतर तो यशस्वी होण्यासाठी कोणत्या बाबी आवश्यक असतात, त्यासाठी आंत्रप्रिनर्सची मानसिकता कशी हवी? स्टार्टअपची अर्थव्यवस्था नेमकी कशी असते? या सर्व बाबींसह आरोग्य, संपत्ती आणि जगण्याच्या प्रयोजनाला लक्ष ठेवत स्टार्टअपचा यशस्वी होण्याचा मंत्र अनेक आंत्रप्रिनर्सला शुक्रवारी (ता. २०) मिळाला.
‘सेतू’चे पहिले सत्र शुक्रवारी (ता. २०) बाणेर रस्त्यावर असलेल्या ‘एसआयआयएलसी’ मीडिया सेंटरमध्ये पार पडले. प्रमुख पाहुणे म्हणून व्यवसाय सल्लागार आर. आर. दासगुप्ता, ‘कोरेको’चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सूर्यवंशी, धुळकर असोसिएट्सचे संस्थापक प्रतीक धुळकर या वेळी उपस्थित होते. प्रास्ताविक ‘एसआयआयएलसी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी निनाद पानसे यांनी केले. ‘‘स्टार्टअपला आवश्यक असलेल्या सेवा अनेक संस्था पुरवितात. मात्र स्टार्टअप यशस्वी होण्यासाठी आंत्रप्रिनर्सची मानसिकता कशी विकसित झाली पाहिजे, यावर कोणी लक्ष देत नाही. ही मानसिकता निर्माण करण्याचे व वाढविण्याचे काम ‘सेतू’मध्ये केले जात आहे.’’
सत्राच्या माध्यमातून अनेक स्टार्टअप्स समजल्या, ज्या नागरिकांच्या गरजा कशा पूर्ण करीत आहेत, तसेच त्या यशस्वी होण्यामागील प्रवास लक्षात घेण्यासाठी असे उपक्रम गरजेचे आहेत, अशी सर्व उपस्थित स्टार्टअप्सनी मागणी केली. कार्यक्रमाच्या शेवटी जान्हवी पवार यांनी आभार मानले.

स्टार्टअप यशस्वी आणि शाश्वत व्हायचे असेल तर व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबी विचारात घेतल्या गेल्या पाहिजेत. इतर देशांप्रमाणे भारतालादेखील मंदीचा फटका सहन करावा लागणार आहे. त्यामुळे जगाच्या परिस्थितीचा विचार करून निर्णय घेणे गरजेचे आहे. कोणीतरी तुम्हाला मार्गदर्शन करेल, याची वाट पाहत बसू नका.
- आर. आर. दासगुप्ता, व्यवसाय सल्लागार (फोटो सोबत जोडला आहे.)

स्टार्टअपला हे सत्र ‘सेतू’ या नावाप्रमाणेच इतर आंत्रप्रिनर्सशी कनेक्ट करणारे ठरले. त्यामुळे या कार्यक्रमाचा उद्देश साध्य झाला आहे. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अनेक संकल्पना आंत्रप्रिनर्सला समजल्या. त्याचा फायदा सहभागी झालेल्या स्टार्टअपला नक्की होईल.
- संजय सूर्यवंशी, संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, ‘कोरेको’

सत्रात सहभागी झालेल्या स्टार्टअपचे अभिप्राय :
1. नवीन कल्पनांची देवाणघेवाण आणि या कल्पना स्टार्टअपसाठी कशा उपयुक्त ठरतील
2. स्टार्टअप कल्पनेला चालना देण्यासाठी कुशल मनुष्यबळ कसे मिळवावे
3. स्टार्टअपच्या समोर कोणती आव्हाने आहेत आणि ती कशी सोडवली पाहिजेत, हे खूप उपयुक्त होते
4. संस्थापकांना संस्थापक कनेक्ट करणे ही उत्तम कल्पना आहे, जिथे तंत्रज्ञानाचा पाया आहे, तिथे ते सहजपणे काम करू शकतात
5. सेतू आम्हाला आमच्या व्यवसायात यशस्वी होण्यासाठी व्यासपीठ आणि प्रोत्साहन देईल

सहभागी स्टार्टअप्स
1. वेंकटेश कौशिक, संस्थापक, निओ ॲग्रोफूड
2. निखिल कुलकर्णी, व्यवस्थापकीय संचालक, टेकिगो सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड
3. आदित्य वाढोकर, संस्थापक, फ्लिगन सिस्टिम्स प्रा. लि.
4. सचिन पंडित, लर्नकिज एडुटेनमेंट
5. संकेत जीवने, संस्थापक, ग्रोललॉक


सकाळनगर : ‘सेतू’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सत्रात सहभागी झालेले मान्यवर.