‘शताब्दी’ऐवजी वंदे भारत एक्स्प्रेस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘शताब्दी’ऐवजी 
वंदे भारत एक्स्प्रेस
‘शताब्दी’ऐवजी वंदे भारत एक्स्प्रेस

‘शताब्दी’ऐवजी वंदे भारत एक्स्प्रेस

sakal_logo
By

पुणे, ता. २३ ः पुणे-सिकंदराबाद रेल्वे मार्गावर शताब्दी एक्स्प्रेसऐवजी वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे. दक्षिण मध्य रेल्वेने याची अधिसूचना काढली असून पुणे व सिकंदराबाद विभागाला यासाठीच्या आवश्यक ती सर्व तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. वंदे भारत एक्स्प्रेसचा वेग जरी ताशी १८० किमी धावण्याचा असला तरीही ज्या ट्रॅक वरून धावेल तो अपग्रेड केला नसल्याने वंदे भारत ११० किमी धावेल. वेळ फारसा वाचणार नाही. मात्र तिकीट दरात मोठी वाढ होणार आहे.

पुण्यातून दोन वंदे भारत एक्स्प्रेस
रेल्वे मंत्रालयाने २०२३ या वर्षात देशातील विविध महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावरून सुमारे २५ वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याचा निर्धार केला आहे. यात पुण्यातून दोन वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे. यात पुणे-सिकंदराबाद शताब्दी एक्स्प्रेस व मुंबई-पुणे-सोलापूर एक्स्प्रेसचा समावेश आहे. फेब्रुवारी महिन्यात या दोन्ही रेल्वे धावण्याची शक्यता आहे.

वेग अन् तिकिटाचे गणित
- पुणे-सिकंदराबाद रेल्वे मार्गावर पुणे ते दौंड हा विभाग ताशी १३०चा करण्यात आला
- मात्र अजूनही रेल्वे ताशी ११० किमी वेगानेच धावत आहे
- दौंड ते वाडी दरम्यानचा ट्रॅक देखील ताशी ११० किमीसाठीच आहे
- त्यामुळे वंदे भारत एक्स्प्रेसने किमान ३० मिनिटे वेळ वाचू शकतो
- त्याचे तिकीट दर मात्र आताच्या तिकिटाच्या दरापेक्षा सुमारे ४० ते ५० टक्के अधिक असणार आहे
- त्यामुळे सामान्य प्रवाशांना यातून प्रवास करणे परवडणारे नाही
- राजधानी एक्स्प्रेसला तेजसचे डबे जोडल्यानंतर राजधानीच्या तिकीट दरात वाढ झाली
- तोच बदल ‘शताब्दी’च्या बाबतीत लागू केला जाईल
- वंदे भारत एक्स्प्रेसमुळे प्रवासाचा वेळ वाचेल, प्रवास आरामदायक होईल, मात्र खर्चिक देखील होणार


पुणे स्थानकावरून वंदे भारत एक्स्प्रेस धावणार हे निश्चित झाले आहे. त्या दृष्टीने कामे देखील सुरू झाली आहेत. मात्र कोणत्या तारखेला सुरू होईल हे आताच सांगता येणार नाही.
- बी. के. सिंग, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पुणे